शिवाजीनगर पोलीसान कडून वाहन चोरीचे गुन्हे उघड. 2 मोटर सायकल बरोबर एक आरोपी ताब्यात.

दशरत गायकवाड पुणे प्रतिनिधी

शिवाजीनगर:- दिनांक 24 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव अनुशंगाने सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे आपल्या स्टाफसह शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार भिवरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंगला टॉकिजच्या पाठीमागे पुणे मनपा जवळ शिवाजीनगर येथे एक इसम त्यांचे अंगात निळ्या रंगाचा. चेक्सचा शर्ट खाकी रंगाची पॅन्ट व पायात चप्पल हा इसम संशयरित्या होन्डा कंपनीची अॅक्टिव्हा ग्रे रंगाची मोपेड गाडीसह वारंवार त्याच भागात फिरताना दिसत आहे. अशी माहीती मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना कळविली असता, त्यांनी सदर ठिकाणी जावून खात्री करून कारवाई करणेबाबत आदेशित केले.

सदरबाबत तपास पथकातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे हे स्टाफसह मंगला टॉकिज पुणे मनपा येथे गेले असता. सदर ठिकाणी वरील वर्णनाचा इसम होन्डा कंपनीची ग्रे रंगाची अॅक्टिव्हा गाडीवरून संशयितरित्या फिरताना दिसला त्यास थांबण्याचा इशारा केला असता तो दुचाकीवरून पळु लागल्याने त्याचा पाठलाग करून त्यास थोड्या अंतरावर पकडले व त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव रवि दशरथ वाकोडे, वय 38 वर्ष, रा. शिंदे वस्ती, संगमवाडी पुणे असे सांगितले. त्यास त्याचे ताब्यात मिळून आलेल्या गाडी क्र. एम एच 12 एस एच 7961 या गाडीबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला नंतर सदर गाडीच्या नंबरबाबत पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरून माहीती घेतली असता सदर गाडी चोरी झालेबाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं. 121 / 2022 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे माहीती प्राप्त झालो..

सदर आरोपीस विश्वासात घेवून त्याचेकडे मिळून आलेली गाडी ही त्याने रोकडोबा मंदीर शिवाजीनगर गावठाण, शिवाजीनगर पुणे येथून चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचेकडे सखोल तपास केला असता, खालील नमुद दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून चोरी केलेल्या मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहे.

उघडकीस आलेले गुन्हे

शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे गु. रजि. नं. १२७ / २०२२ भादवि कलम ३७९ -१. २. फरासखाना पोलीस ठाणे पुणे गु. रजि. नं. १९७ / २०२१ भादवि कलम ३७९ – आरोपी नामे रवि दशरथ वाकोडे, वय ३८ वर्ष, रा. शिंदे वस्ती, संगमवाडी पुणे याचेकडून एकूण ७५,०००/ रुपये किंमतीचे एकूण ०३ मोपेड गाड्या जप्त करून ०३ गुन्हे उडकीस आणले आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उपायुक्त परि-०१, पुणे शहर, श्रीमती प्रियंका नारनवरे, मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे शह रमाकांत माने, तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड, सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलीस हवालदार गणपत बाळकोळी, अविनाश भिवरे, रणजित फडतरे, अतुल साठे, प्रविण राजपुत, रुपेश वाघमारे, बशीर सय्यद तसेच पोलीस शिपाई दिलीप नांगरे रोहीत झांबरे, तुकाराम म्हस्के यांनी केलेली आहे .

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

5 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

17 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

17 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

17 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

17 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

17 hours ago