मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधि
नाशिक :- नाशिक शहरात मागील काही दिवसापासून मोटर सायकल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसाना यावर आवर घालण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. असाच चोरीच्या एका घटनेचा छळा लावण्यात पोलिसाना यश आले आहे. दोन दुचाकी चोरट्यांना जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाला यश आले आहे. कुणाल विजय लहांगे वय 18 वर्ष, रा. कोळीवाडा संसारीगाव व वेदांत चंद्रकांत बच्छाव वय 18 वर्ष, रा. पांजरा कॉलनी, ता. साक्री, जि. धुळे असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी ही पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
शहरासह उपनगरांमध्ये दुचाकी चोरीचे सत्र सुरू असून, वाहनचोरीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी गुन्हेशाखेला शोध घेण्यासाठी आदेश दिले हाेते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय ददन पासवान वय 22 वर्ष, रा. देवळाली कॅम्प यांची दुचाकी इमारतीच्या वाहनतळावरून अज्ञात चोरट्यांनी लांबविली होती. गुन्हे शाखा दोनकडून समांतर तपास सुरू असताना कुणाल लहांगे याने साथिदारांसह चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून लहांगे यास अटक केल्यानंतर बच्छाव यास धुळ्यातून ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, सहायक पोलीस आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांनी सुचनांप्रमाणे हवालदार गुलाब सोनार, नंदकुमार नांदुर्डीकर, राजेंद्र घुमरे, अनिल लोंढे, संतोष ठाकूर आदी सहभागी झाले होते.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…