नाशिक: गणेशउत्सव साजरा करताना कोणत्याही मंडळाकडून कायद्याचे उल्लघन होऊ नये: सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे


✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी ✒️

नाशिक:- उद्या पासून सर्वत्र गणेशउत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशउस्तव साजरा करताना कोणत्याही मंडळाकडून कायद्याचे उल्लघन झाल्यास संबंधित मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे यांनी दिला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिस ठाण्यात पंचवटी, म्हसरूळ आणि आडगाव या तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गणेश मंडळांच्या संयुक्त बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, म्हसरूळचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक साखरे, आडगावचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख, पोलिस निरीक्षक युवराज पत्की, सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, मनपाचे पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया यांच्यासह अग्निशमन व विद्युत विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांना शासन व पोलिस आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांचे अनुपालन करणे बंधनकारक असल्याबाबतची माहिती देण्यात आली. सर्व गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी उपस्थित केलेल्या सूचनांचेही यावेळी निराकरण करण्यात आले. बैठकीस उपस्थित मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी पोलिस विभागास पूर्णपणे सहकार्य करणार असल्याबाबत ग्वाही दिली. या बैठकीस गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेश मंडळांनी ही काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. वाहतुकीस अडथळा होणार नाही, मनपा व पोलिस परवानगीशिवाय व्यासपीठ उभारू नये, ध्वनिक्षेपकाची डेसिबलची क्षमता ओलांडली जाऊ नये, मद्यपान करू नये, वीजपुरवठा अधिकृत घ्यावा, घातपात टाळण्यासाठी स्वयंसेवकांनी नजर ठेवावी, सीसीटीव्हीचा वापर करावा, स्वयंसेवकांचा जास्तीत जास्त वापर करावा, वर्गणी जमा करताना बळजबरी करू नये, गुलालाचा वापर न करता फुलांचा वापर करावा, निर्माल्य कलशाचा वापर करावा, आक्षेपार्ह देखावे सादर करू नये. तसेच ड्रोन कॅमेरा वापरण्याकरिता पोलिस आयुक्त यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे आदी सूचना देण्यात आल्या.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

9 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

21 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

21 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

21 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

21 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

21 hours ago