प्रवीण जगताप, प्रतिनिधी
चाकुर:- रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्याकडे एका तक्रारदाराने माहिती दिली की, काही महिला व पुरुष त्याला कमी दरात दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने विकण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते लोक माझी फसवणूक करतील याबद्दल मला संशय निर्माण झाला असून, सदरच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार आजच संध्याकाळी सहा वाजता होणार आहे,’ अशी माहिती दिली.
सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी चाकूर पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून माहिती मधील ठिकाणी सापळा लावण्यात आला. त्यानुसार सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सोन्याची देवाणघेवाण होत असताना पोलिसांचा संशय आल्याने सदरच्या टोळीतील सदस्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजूबाजूला दबा देऊन बसलेल्या पोलिसांनी त्यांना पकडले. त्याच्या जवळ असणाऱ्या पिशवीची तपासणी केली असता त्याच्याजवळ पिवळ्या धातूचे दागिने सापडले. पोलिसांनी टोळीतील सदस्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, “आम्हाला पैशाची गरज असल्याने आम्ही हे सोने कमी किमतीत विकायचे आहे” असे सांगत ग्राहकाला खोटे सोने विकणार होतो.अशी कबुली दिली.
बनावट सोने विकण्याचा टोळीतील 6 गुन्हेगाराचे नावे पुढीलप्रमाणेः
1) जया दीपक शिंदे, वय 35 वर्ष, राहणार विठ्ठल नगर,
तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद. 2) शीला तपास भोसले, वय 37 वर्ष, राहणार विठ्ठल नगर, तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद. 3 ) शुक्सला समाधान काळे, व 39 वर्ष, राहणार मोतीहरा तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद. 4) राम मारुती कोकरे, वय 26 वर्ष, राहणार कोरेवाडी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद. 5) सुरज समाधान काळे, 21 वर्ष, राहणार कुंभारी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद. 6) सुनील सिताराम भोसले, 61 वर्ष राहणार मोतीझरा गल्ली, तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद.
यांचे विरुद्ध पोलिस ठाणे चाकूर येथे दिनांक 26 ऑगस्ट रोजी गुन्हा रजिस्टर करूण कलम 307/2022, कलम 420,511,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्यात नमूद आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडील बनावट सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास चाकुर पोलिस करीत आहे.
बनावट सोन्याची विक्री करणाऱ्या आणखीन टोळ्या सक्रीय असल्याची शक्यता नाकारता येत नसून सदरच्या टोळ्या मधील सदस्य प्रथमता खरे सोन्याचे दागिने दाखवून खरेदी-विक्रीचा व्यवहार फिक्स करतात. जेव्हा ग्राहक आमिषाला बळी पडून स्वस्तात सोने घेण्यासाठी येतो तेव्हा घाई गडबड करून किंवा पोलिस आल्याचा बनाव करून गोंधळाची परिस्थिती निर्माण करतात व घाई गडबडीत बनावट सोने देऊन पैसे घेऊन पळून जातात प्रसंगी ग्राहकास मारहाण सुद्धा करतात. त्यामुळे नागरिकांनी स्वस्तात सोने मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.सदरची कारवाई सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांचे मार्गदर्शनात चाकूर पोलिस स्टेशनचेपोलिस निरीक्षक बालाजी मोहिते व त्यांच्या पथकातील पोलिसांनी केली आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…