मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आधार फाउंडेशनची वार्षिक सभा नुकतीच साई मंदिर सभागृहात पार पडली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आधार फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष लक्ष्मीकांत धार्मिक, उपाध्यक्ष पराग मुडे, सचिव प्रा. गजानन जुमडे आणि विविध समित्यांचे प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी वार्षिक सभेच्या अहवाल सौ. माधुरी विहिरकर यांनी सभेपुढे सादर केला. आधार फाउंडेशनच्या घटनेनुसार दरवर्षी नव्याने कार्यकारिणी गठीत करण्याचे ठरविण्यात आले असल्यामुळे वर्ष २०२३ – २४ साठी आधार फाउंडेशनची वार्षिक कार्यकारिणी सर्वानूमते खालीलप्रमाणे गठीत करण्यात आली. यात अध्यक्षपदी जगदीश वांदिले, उपाध्यक्षपदी सुनील डांगरे, उपाध्यक्षपदी राजेश कासवा, सचिवपदी श्याम निमट, सहसचिव सुहास घिनमिने, कोषाध्यक्षपदी वासुदेव पडवे, सहकोषाध्यक्षपदी दुर्गाप्रसाद यादव, संघटक सौ. आशा कोसुरकर, सल्लागार पराग मुडे, लक्ष्मीकांत धार्मिक, डॉ. गिरीधर काचोळे आदींची निवड करण्यात आली.
यावेळी आधार फाउंडेशनमध्ये नवीन सदस्यांनी प्रवेश केला यात दुर्गाप्रसाद यादव, स्वप्नील बाराहाते, सुहास घिनमिने, अभय दांडेकर, प्रशांत भेंदुरकर, जेम्स सॅम्युअल, वासुदेव पडवे, नेताजी लाजूरकर, राजा महाराज शेंडे, सचिन धारकर, सुनील कुंभलकर, डॉ.नितेश तेलहांडे, मधुकर बावणे, सुनील पिंपलकर, सौ.आशा कोसुरकर, सौ.जया महाजन, सौ.कल्पना हिवंज, सौ.जोस्ना बावणे, सौ. चंदा येलेकर, अँड. इंब्राहिम बख्श, अँड संदीप झिलटे, विनय घवघवे यांनी आधार फाउंडेशन मध्ये प्रवेश केला. यासर्वांचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात केले.
यावेळी डॉ.गिरीधर काचोळे यांना पदवी प्राप्त झाल्याबद्दल तसेच डॉ. शरद विहिरकर यांची नागपूर विघापीठामध्ये इंग्रजी विषयाच्या अभ्यासमंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत धार्मिक यांनी नवीन कार्यकरिणीला शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. नवनिर्वाचित अध्यक्ष जगदीश वांदिले यांच्या मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत धार्मिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सभेचे संचालन माधुरी विहिरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा .अभय दांडेकर यांनी केले.
या वार्षिक सभेच्या यशस्वी आयोजनाकरिता सौ.विरश्री मुडे, ज्योती धार्मिक, मनोहर ढ़गे, प्रा.विठ्ठल घिनमिने, सुभाष शेंडे, सुरेश गुंडे, तुषार लांजेवार आधार फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले .
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…