कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करा :पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे

विश्वास वाडे चोपडा तालुका प्रतिनिधी

चोपडा:- तालुका शांतता कमिटीच्या बैठकीत रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणुकीत लाऊड स्पीकर अथवा पारंपरिक वाद्य वाजता येणार आहेत तसेच वाद्य वाजवताना इतर नागरिकांना त्यापासून त्रास होणार नाही याची दक्षता गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावयाची आहे. गणपती मिरवणूक अति उत्साहात शांततेत पार पाडावी मिरवणुकीत इतर कोणीही अनुचित प्रकार करण्याच्या प्रयत्नात असेल त्याला जागेवरच थांबवण्याचा प्रयत्न नागरिकांनी करावे व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे,
मिरवणुकीत शहरासह तालुक्यातील गणेश भक्तांनी आनंद घ्यावा त्यांना कुठलाही निर्बंध नाही रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवण्याची जिल्हाधिकारी यांचे आदेश आल्यावर तसे गणेश भक्तांना कळविण्यात येईल तसेच कायदा व सुव्यवस्था मध्ये बाधा येऊ नये म्हणून 67 लोकांवर गणेशोत्सव दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी उपस्थित राजकीय सामाजिक तसेच सर्व गणेश भक्तांना संबोधित करताना सांगितले.

यावेळी गणेश भक्तांचे समस्या असतील ते व्यक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने शहरात 56 तर ग्रामीण भागातून 27 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अधिकृत परवानगी देण्यात आलेली आहे उर्वरित दोन गणेश मंडळांना देखील पोलिस मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी पोलीस प्रशासनाने परवानगी द्यावी त्यासाठी आम्ही ज्येष्ठ मंडळी पुढाकार घेऊन त्या मंडळाची हमी घेणार असून त्यांना या मिरवणुकी पासून वंचित ठेवू नका असे व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अमृतराव सचदेव यांनी यावेळी सांगितले गणेश भक्तांना वीज वितरण कंपनीने कुठल्याही प्रकारची डिपॉझिट न घेता पाच दिवस विजेचा पुरवठा देण्याची मागणी करण्यात आली आहे. आठवडी बाजार हा विसर्जनाच्या दिवशी येत असल्याने आठवडे बाजार त्या दिवशी बंद करण्यात यावा, मिरवणुकीच्या मार्गावर नगरपरिषदेने रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आली. आदी विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात नगरपरिषदेचे नाट्यगृहात शांतता कमिटीची मिटिंग संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर शांतता कमिटीचे अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी सहायक अधीक्षक कृषिकेश रावले चोपडा, रमेश चोपडे चाळीसगाव, तहसीलदार अनिल गावित वीज वितरण कंपनीचे सोनवणे, पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे अजित साबळे संतोष चव्हाण देविदास कुनगर किरण दांडगे सहाय्यक पोलिस निरीक्षक अडावद आदी उपस्थित होते.

या चंद्रहास भाई गुजराथी, अमृतराव सचदेव, राजेंद्र बिटवा गजेंद्र जैस्वाल, पंकज पाटील, प्रकाश पाटील घुमावल, अनिल वानखेडे, गोपाळ सोनवणे, रवींद्र मराठे, गंभीर सर लासुर, महेंद्र धनगर, आबा देशमुख, प्रवीण गुजराथी तसेच तालुक्यातील पोलीस पाटील विविध मंडळांचे पदाधिकारी गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

9 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

21 hours ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

21 hours ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

21 hours ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

21 hours ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

21 hours ago