बच्चू कडूंची सटकली, गुवाहटी’ म्हटल्यामुळे आमदार रवि राणावर जहरी टीका.
मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
मुंबई:- सध्या महाराष्ट्राचे अधिवेशन सुरू आहे. राज्यात शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर हे त्याचे पहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी मोठ्या प्रमाणात डागल्या जात आहे.
महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. शिंदे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार एकमेकांच्या बरोबर भिडले होते. त्यानंतर, गुरुवारीही सत्ताधारी पक्षातील आमदार सकाळीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमा झाले आणि विरोधकांच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. बंडखोर आमदारांना पैसे घेतल्याच्या आरोपावरुन टार्गेट करण्यात येत आहे. त्यावरुन, माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. आता, अपक्ष आमदार रवि राणा यांच्यावर त्यांनी जहाल अशी टीपणी केली आहे. त्यामुळे राज्यातील वाटेवर अजुन तापण्याचे चिन्ह दिसून येत आहे.
काही दिवसापासून विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या “50 खोके बिलकुल ओके” या टीकेला प्रत्त्युत्तर देताना शिंदे गटातील आमदारांकडून “सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके” असे पोस्टर झळकवण्यात आले. त्यानंतर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी या टीकेला प्रत्त्युत्तर दिलं होत.
आता, शिंदे गटाचे आमदार माजी मंत्री बच्चू कडू यांनी आपल्या आक्रमक शैलीत या टिकेचा खरपूस समाचार घेतला. तसेच, विधानसभेच्या पायरीवर काय घडलं हेही त्यांनी सांगितलं. बच्चू कडूंनी अशी नामर्दासारखी काय घोषणाबाजी करत म्हणत विरोधकांना टोला लगावला. मात्र, आता भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या आमदार रवि राणा यांचा चांगलाच समाचार त्यांनी घेतला आहे. आमदार रवि राणा यांनी गुवाहटी म्हणत आमदार बच्चू कडूं याना डिवचलं होतं. त्यावर, कडू आक्रमक झाले असून रवी राणावर जहाल टीका केली आहे.
मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैया, पैसा सबका रुपया,’ असे म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला होता. राणा यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना बच्चू कडूंची जीभ चांगलीच घसरली. ‘अबे हरामखोराची औलाद… आम्ही जर गुवाहटीला गेलो नसतो तर तू मंत्रिपदाच्या शर्यतीत नसता. तू आता मंत्रिपदाच्या शर्यतीत रांग लावून आहे,’ असं आमदार कडू यांनी म्हटलं. तसेच, आम्ही बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाहीत, असा टोलाही कडू यांनी आमदार रवि राणांना लगावला.
मर्दानगी असल्यास समोर या, पुरावे द्या
‘मला तर वाटतं की काही लोक सभागृहात काहीच बोलत नाहीत आणि पायरीवर येऊन जोरजोरात बोंबलतात. पायऱ्यांवर कुणी बोललं आणि बॅनर छापले की त्याची ब्रेकिंग होते’, असे म्हणत नाव न घेता आमदार अमोल मिटकरीवर निशाणा साधला. तसेच, ‘५० खोके, एकदम ओके वगैरे घोषणा त्यांनी केल्या. तुम्हाला जर ५० खोके दिले असं वाटत असेल, तर कारवाई करा. असं नामर्दांसारखं वक्तव्य का करत आहात? मर्दानगी असेल, तर समोर या आणि पुरावे द्या’, असं आव्हानच आमदार कडूं यांनी विरोधकांना दिलं आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…