ग्रामपंचायत बेडग येथील गावबंद करून गावावर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार टाकणाऱ्या लोकांवर गुन्हे नोंद करा वंचितचे सांगली जिल्हा अधीक्षक यांना निवेदन.

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली,दि. २७ जुलै:- सांगली जिल्ह्यातील बेडग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बांधण्यात आलेली स्वागत कमान ग्रामपंचायतने अवैधरित्या पडली. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. यावेळी आंबेडकरवादी लोकांकडून आंदोलने करण्यात आली पण न्याय मिळत नव्हता त्यामुळे गावातील जातीय मानसिकतेच्या लोकान विरूध्द कारवाई व्हावी म्हणून गावातील आंबेडकरवादी लोकांनी आपल्या मुला बाळासह महाराष्ट्र मंत्रालयावर पायी लाँग मार्च काढला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी या आंदोलनाची दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर जातीवादी मानसिकतेच्या लोकांनी गावबंद करून गावावर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार टाकला होता.

ग्रामपंचायत बेडग येथील गावबंद करून गावावर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार टाकणाऱ्या लोकांवर गुन्हे नोंद करा अशी मागणी वंचित बहुजन आघडीच्या वतीने सांगली जिल्हा अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचा वतीने सांगण्यात आले की, बैठकीनंतर मिरज ग्रामीण पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सद्यस्थितीत गावात दोन्ही समाजात जातीयद्वेष पसरविण्याचे काम सातत्याने सुरू आहे. त्याचप्रमाणे ५ दिवस गाव बंद आहे. सामाजिक व आर्थिक बहिष्कार लादण्यात आला आहे. हा सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार जातीय भावनेतून व अस्पृश्यतेवर आधारित आहे म्हणून गाव बंद ठेवून लोकांना वेठीस धरणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात यावा. यावेळी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, राजू मुलानी, विशाल धेंडे, पवन वाघमारे, नझीरहुसेन झारी, अशोक लोंढे आदी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

20 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

22 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago