रायगड जिल्हात आरोग्य व्यवस्थेने घेतला 12 वर्षीय बालिकेचा जीव, सर्पदंशानंतर 4 रुग्णालयांत उपचार झाला नाही, बालिकेचा तडफडून मृत्यू.

रत्नु कांबळे, कोकण ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन रायगड:- जिल्हातील पेण तालुक्यातून एक आरोग्य सेवेचे धिंडवडे काढणारी घटना समोर आली आहे. एका 12 वर्षीय मुलीला सर्पदंश झाला त्या तिला तडकाफडकी रुग्णालयात नेण्यात आले. पण या रुग्णालयात सर्पदंशाचा औषधी नसल्याने उपचार करण्यात आला नाही. असेल ते चार रुग्णालय घुमले पण एकही रुग्णालयात तीचावर उपचार करण्यात आला नाही. त्यामुळे 12 वर्षीय चिमुकलीचा तडफडून मृत्यु झाला.

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जिते गावातील सारा ठाकूर या १२ वर्षीय मुलीला मंगळवारी रात्री मण्यार जातीच्या विषारी सापाने दंश केला होता. सर्पदंशानंतर चार रुग्णालयांत उपचार झाला नाही. त्यामुळे 12 वर्षीय बालिकेचा तडफडून मृत्यू झाल्याची माहिती गावात कळताच सर्वत्र आरोग्य व्यवस्थावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार. सारा ठाकूर या १२ वर्षीय मुलीला मंगळवारी रात्री मण्यार जातीच्या विषारी सापाने दंश केला होता. जेंव्हा सर्पदंश झाला तेंव्हा त्वरित तिला पेण मधील सरकारी हॉस्पिटलमध्ये मध्ये घेऊन गेले त्यांनी सांगितले पुढे न्या तिचे वडिल व नातेवाईक तिला त्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्यांनी ही तेच सांगितलं आमच्याकडे औषधोपचार नाही मग तिथून पुन्हां त्या मुलीला अलिबाग मधील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केली त्यांनी ही सांगितलं आमच्याकडे औषधे नाहीत तुम्हीं पुढं न्या मग त्यानंतर तिथून त्या मुलीच्या वडिलांनी व नातेवाईकांनी त्या मुलीला कलंबोली येथील MGM हॉस्पिटलमध्ये नेली पण त्या 12 वर्षाच्या मुलीला तिथं मृत घोषित करण्यात आले.

इथंच नेमकं समजून घ्या हा सगळा प्रवासच 4 ते 5 तास एवढा झाला आज जर पेण सरकारी रुग्णालयात औषधे असती तर त्या 12 वर्षीय निष्पाप चिमुकलीचे प्राण वाचले असते. पण इथं लक्ष न देता रोज आमच्या पक्षात कोण येतंय यासाठीच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे जीव गुरफटलेले आहे. यासारखी दुसरी शोकांतिका नाही,: श्री. राहुल घरत सामाजिक कार्यकर्ते

रायगड जिल्हातील आरोग्य व्यवस्था सलाईन वर असल्याचे चित्र या घटनेवरून दिसून येत आहे. जिल्हातील आरोग्य सेवा नावाला उरल्यामुळे झाल्याने रुग्णाचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्यामुळे हे रुग्ण आता फक्त भगवान भरोसे आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून ही आरोग्य खाते रायगड जिल्हात उत्तम अशी आरोग्य सेवा देण्यात अपयशी ठरले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

18 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

20 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago