वर्धा जिल्हातील साटोडा ग्रामपंचायतीतील सदस्यांनी मनसोक्त दारू ढोसून मद्यधुंद अवस्थेत ग्रामपंचायत कार्यालयात घातला धिंगाणा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील साटोडा ग्रामपंचायत मध्ये काही ग्रामपंचायत मधील सदस्यांनी मनसोक्त दारू ढोसून मद्यधुंद अवस्थेत ग्रामपंचायत कार्यालयात घातला धिंगाणा घातल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हात खळबळ उडाली आहे.

फेरफार वेळीच का देत नाही, या क्षुल्लक कारणावरून साटोडा ग्रामपंचायतीतील काही सदस्यांनी मनसोक्त दारू ढोसून येत ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या पुरूष आणि महिला कर्मचार्‍यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्याची घटना शुक्रवारी घडली. महिला कर्मचार्‍यांना शिवीगाळ करीत अशोभनीय वर्तन करणार्‍या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करीत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. याप्रकरणी तक्रार करण्यात आली नाही; मात्र विश्वसनीय सूत्रांकडून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.

शहरालगत साटोडा ग्रामपंचायत आहे. या ना त्या कारणाने ही ग्रामपंचायत सातत्याने चर्चेत असते. विकासकामांना या ग्रामपंचायत हद्दीतील काही बोटावर मोजण्याइतपत नागरिकांकडून सातत्याने विरोध होत असतो. यातून विकासाला खिळ बसत आहे. सुरू असलेल्या रस्त्याच्या कामालाही काहींकडून विनाकारण विरोध केला जात आहे.

आलोडीतील अहिंसानगरात काही वर्षांपूर्वी नालीचे सदोष बांधकाम करण्यात आले. याशिवाय अनेक विकासामांत भ्रष्टाचाराच्या कारणावरून तत्कालीन सरपंच नितीन कोंबे याला अटक करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी पदाचा दुरूपयोग आणि अविश्वासामुळे सरपंचाला अल्पावधीतच पायउतार व्हावे लागले. ही प्रकरणे ताजी असतानाच केवळ फेरफार वेळीच दिला नाही म्हणून ग्रामपंचायतीतील तीन सदस्यांनी मद्यधुंद अवस्थेत ग्रामपंचायतीत दाखल होत पुरूष आणि महिला कर्मचार्‍यांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी सरपंच हेही उपस्थित होत; त्यांनी मध्यस्थी न करता बघ्याची भूूमिका घेतली. परिणामी, मद्यपी सदस्यांचे आणखी मनोबल उंचावले आणि त्यांनी तुमच्या कडून जे होते ते करून घ्या, अशीदादागिरीची भाषा केली. घडलेल्या घटनेबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली नाही.

महिला आणि पुरूष ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी मद्यपी ग्रामपंचायत सदस्यांंचे सदस्यत्व रद्द करण्यासह गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेचे सीईओ, पोलीस अधीक्षक यांच्याकडे ग्रामपंचायत कर्मचारी आणि रहिवासी नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात जात महिला आणि पुरूष कर्मचार्‍यांना शिवीगाळ केली. या सर्व प्रकाराविषयी अनभिज्ञ होतो. मात्र घडलेला प्रकार अतिशय लाजिरवाणा आहे. संबंधित सदस्यांना कठोर शासन व्हायलाच पाहिजे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 97664453487385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

22 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

24 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago