गडचिरोली जिल्हातील किरणच इंग्लंडला जाऊन शिक्षण घेण्याचं स्वप्न झाल साकार; 40 लाखांची मिळाली शिष्यवृत्ती.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम रेगुंठा येथील ‘लेडी ड्रायव्हर’ म्हणून प्रसिद्ध असलेली किरण कुर्मा हिला इंग्लंडला जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिला मदतीचा हात देत यंत्रणा गतिमान केल्यामुळे राज्य सरकारची तब्बल 40 लाख रुपयांची शिष्यवृत्ती तिला मिळणार आहे.

गडचिरोली जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा मागास जिल्हा असून त्यात अनेक हिरे असून त्यांना चमकण्यासाठी थोडा प्रकाश हवा तो त्यांना मिळाला तर ते गगनात भरारी घेऊ शकतात. असाच अतिदुर्गम रेगुंठा ते सिरोंचापर्यंत काळीपिवळी (टॅक्सी) चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी किरण कुर्मा या 24 वर्षीय युवतीला राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाने 40 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली आहे.

या शिष्यवृत्तीच्या मदतीने ती इंग्लंड देशातील लंडनमध्ये इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट हा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून दोन वर्षे एखाद्या कंपनीत काम करणार आहे. त्यानंतर ती देशात परत येणार आहे. रेगुंठा हे गाव सिरोंचा तालुकास्थळापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे.

किरण ही उच्चविद्याविभूषित असून तिने तेलंगणा राज्यातील हैदराबाद राज्यातील उस्मानिया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. अर्थशास्त्र या विषयात ती एम.ए. आहे. शिक्षण घेतल्यानंतर रोजगाराचे साधन म्हणून तिने रेगुंठा ते सिरोंचा दरम्यान काळीपिवळी चालविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तिच्याकडे एकच टॅक्सी होती.

तिने या व्यवसायात स्वतःला झोकून दिले. त्यामुळे या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळवत तिने या व्यवसायात वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता तिच्याकडे तीन टॅक्सी आहेत. एवढ्यावरच न थांबता तिने मार्केटिंगचे उच्च शिक्षण इंग्लंड देशातून घेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो.

यासाठी तिने मुंबई गाठून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी तिच्यासाठी ४० लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. या शिष्यवृत्तीच्या मदतीने किरणचे लंडनच्या विद्यापीठात शिकण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

थेट कार्यालयात जाऊन घेतली भेट…
किरण कुर्माने मित्रांच्या मदतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थेट विधानसभेच्या कार्यालयात भेट घेतली. तिने मुख्यमंत्र्यांकडे आपली इंग्लंडमध्ये शिकण्याची इच्छा व्यक्त करतानाच आपल्या कमकुवत आर्थिक परीस्थितीचीही माहिती दिली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी लगेच समाजकल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना फोन करून किरणला मंत्रालयात जाण्यास सांगितले. किरण सचिवांकडे पोहोचेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी व्हाट्सअपद्वारे भांगे यांच्याकडे अर्ज पाठविला. भांगे यांनी तेव्हाच गडचिरोलीच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांना फोन करून किरणचा प्रस्ताव तत्काळ मंत्रालयात पाठविण्याचे निर्देश दिले.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

5 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

8 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago