एक माणुसकी जपणार व्यक्तिमत्त्व… वन मंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्त…

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- महाराष्ट्र सरकारमध्ये वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री, आणि चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे व्‍यक्तिमत्‍व, प्रतिमा, कार्यक्षमता, प्रभाव, मंत्रालयीन विभागाच्‍या कामाकाजाची जाण, लोकप्रियता, दूरदृष्‍टी, कार्यशैली व जनसामान्य नागरिक आणि कार्यकर्त्या सर्वांना घेऊन पुढे जाण्याच्या शैलीमुळे त्यांना इतर राजकीय नेत्यापेक्षा वेगळे करते.

भुकेलेल्या अन्न, तहानलेल्या पाणी, बेरोजगाराना रोजगार, गरिबांना मायेचा हाथ, शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर पने उभे असलेले पर्यावरणस्नेही सुधीरभाऊ मुनगंटीवार आदर्श लोकप्रतिनिधी, कुशल प्रशासक, सामाजिक न्याय आणि समतेचा आग्रह धरणारे चारित्र्यवान नेते म्हणून जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारे सुधीरभाऊ मुनगंटीवार संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा अभिमान आहे.

जंगलाच्या कुशीत वसलेल्या चंद्रपूर जिल्हात 30 जुलै 1962 रोजी सुधीरभाऊ यांचा जन्म झाला. निसर्गाच्या सानिध्यात बालपणी झालेले संस्कार त्यांनी आयुष्यभर जपले आणि लोक भावनेतून सेवाकार्य करण्याचा मानस आपल्या राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून जोपासले. प्रगल्भ विचारांच्या आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या आज चंद्रपूर जिल्ह्याचे नावलोकिक मिळवून दिले.

सत्तास्थानी असताना तत्त्वांसाठी कोणतीही तडजोड करण्यास नकार देत लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी ते सतत कार्यरत असतात. वैयक्तिक महत्त्वाकांक्षांच्या पलिकडे जाऊन राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या देशभक्ताचे दर्शन त्याच्या कार्यातून समाजाला घडते. सुधीरभाऊ यांनी राजकीय क्षेत्रातील कामगिरीबरोबरच सामाजिक कार्यातही आघाडीवर आहे. सत्तास्थानी, सत्तेच्या राजकारणाचे आकर्षण त्यांना कधीच नव्हते. पडिक जमिनींच्या विकासाबरोबरच त्यांनी वृक्षरोपण करण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारले. ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविले. अत्यल्प खर्चातील हजारो एकरांवर झाडे लावून वृक्षराजी फुलविली. सुधीरभाऊ त्यांच्या कामातून त्यांची दूरदृष्टी दिसून येते. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर त्यांनी निर्व्याजपणे प्रेम केले. सुधीर भाऊ यांनी अंगिकारलेली समाजहिताची विचारसरणी आता पर्यंत जपली आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या जीवन प्रवास…
सुधीर मुनगंटीवार यांचा जन्म 30 जुलै 1962 रोजी महाराष्ट्रातील विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात झाला. चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेच्या सचिवपदी नियुक्ती झाल्यावर वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली आणि तेव्हापासून ते राजकीयदृष्ट्या सक्रिय राहिले. 1989 आणि 1991 मध्ये त्यांनी चंद्रपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवली, परंतु दोन्ही वेळा त्यांना अपयश आले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून एमफिल पूर्ण केले आणि 1993 मध्ये, महाराष्ट्रातील भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष बनले. 1995 मध्ये, त्यांनी चंद्रपूरमधून सुमारे 55,000 मतांच्या विक्रमी फरकाने विधानसभेची निवडणूक जिंकली आणि अखेरीस ‘भाजप – शिवसेना’ युतीच्या महाराष्ट्र सरकारमध्ये ते पर्यटन आणि ग्राहक संरक्षण मंत्री झाले, हे पद त्यांनी 1999 पर्यंत सांभाळले. ते भारतीय जनता पक्षाच्या पंक्तीत सतत वाढत गेले, 1996 मध्ये भाजपच्या महाराष्ट्र राज्य युनिटचे सरचिटणीस आणि 2001 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बनले.

2010 मध्ये मुनगंटीवार यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी एकमताने निवड झाली. त्यांनी ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची जागा घेतली, जे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. 2014 मध्ये, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर, मुनगंटीवार देवेंद्र फडणवीस मंत्रालयात वित्त आणि नियोजन आणि वने मंत्री झाले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

8 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

10 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago