सिंदी रेल्वे येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरग्रस्त घरांची प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांनी केली पाहणी.

शेकडो पूरग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतूल वांदिले यांच्या सामाजिक उपक्रम.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील सिंदी रेल्वे येथे अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यामुळे या पूरग्रस्त भागात पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतूल वांदिले यांनी केली आणि गरजू कुटूंबाना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वतीने मदत केली.

सिंदी रेल्वे येथे निसर्गाच्या प्रकोपाने अनेक प्रभागात अतिवृष्टी झाली असून अनेक घरामध्ये पाणी शिरले. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. या नैसर्गिक संकटाने शेतमजूर, कामगार हतबल झाला असून सातत्याने निसर्गाचा प्रकोप वाढत असल्याने त्यांची दैयनीय अवस्था झाली आहे. शहरात व ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचा घरा मध्ये पाणी शिरले होते. त्यांची पाहणी करून गरजू कुटूंबाना मदत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली.

सिंदी रेल्वे भागातील अतिवृष्टीमुळे अनेक लोकांचा घरामध्ये प्रमाणात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत च्या पावसाने क्षतीग्रस्त झाल्याच्या घटना देखील झाल्या आहे. सोबतच पाळीव जनावराची सुद्धा जीवितहानी झालेली आहे. शेतकरी व नागरिक संकटात सापडला आहे अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी एक हात मदतीचा म्हणून पूरग्रस्त कुटूंबाची पाहणी करून त्यांना मदत केली.

यावेळी पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेकडो पूरग्रस्तांना धान्य किट वाटप करताना माजी नगराध्यक्ष तथा माजी सभापती कृ.उ.बा.स. बबनरावजी हिंगनेकर, शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, माजी उपाध्यक्ष न.प.सुधाकर खेडकर, प्राचार्य तथा माजी उपाध्यक्ष अशोक कलोडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अशोक कलोडे, अमोल बोरकर, वसंता सिर्से, गजानन डबारे, प्रकाश सोनटक्के, युवा शहर अध्यक्ष तुषार हिंगणेकर,माजी नगरसेवक सुमनबाई पाटील, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष बबलू खान, गुड्डू कुरेशी, गजानन खंडाळे, सुनील शेंडे, अशोक सातपुते, रवी राणा, युगल अवचट, मनोहर चंदनखडे, सुनील भुते, पप्पू आष्टीकर, पुरुषोत्तम कांबळे, गजू महाकाळकर, अमोल मुडे, सुशील घोडे यांच्यासह सिंदी रेल्वे भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

10 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

12 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago