विकृतीचा समानार्थी शब्द शरद पोंक्षे: दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना

विकृती या शब्दाचा मराठी शब्दकोषा नुसार समानअर्थी शब्द बिमार, आजार, दुखणं, तिरस्कार, तितकारा बिघाड हा आहे. हाच तिरस्कार व तिटकारा विशिष्ट वर्गाबद्दल म### रोगांनी जर जर झालेल्या शरद पोंक्षे यांच्या पोस्ट मधुन दिसत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील आपल्या भारदस्त आवाज व उत्तम अभिनयामुळे मराठी प्रेक्षकांचे मन जिंकणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी मुलगी कु. सिद्धी शरद पोंक्षे आज पायलट झाली आहे. इयत्या चौथी पासून तिने पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. अत्यंत खडतर परिस्थितीत माझे आजारपण, लॉकडाऊन व आर्थिक स्थिती बिकट हे सर्व अडथळे पार करत कोणतेही “सवलत व आरक्षण” नसताना केवळ बुद्धिमत्ता व परिश्रम यांच्या जोरावरती ती पायलट झाली आहे. बापाला आणखी काय हवे आहे. अशा आशयाची फेसबुक पोस्ट शेअर केली होती. प्रथम एक मराठी मुलगी पायलट झाल्याबद्दल तिचे मी भिम टायगर सेनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन व तिच्या पुढील प्रवासाला मनापासून शुभेच्छा देतो.

पण प्रश्न असा निर्माण होतो की एक बाप मुलीचे कौतुक करत असताना त्याच कौतुकाच्या आधारे तो आपल्या मनातील विशिष्ट जाती बदल राग, द्वेष, चीड जळफळाट व तिरस्कार नावाची घाण पाठीमागून काढण्याऐवजी तो तोंडातून काढत आहे. मुळातच मुलगी पायलट झाली त्यात आरक्षण व सवलत यांचा तिळमात्र संबंध नसताना. आरक्षणावर बोट ठेवुन शरद पोंक्षाना हे दाखवायचे आहे की आरक्षण घेणारे ओबीसी, एसटी व एससी हे लोक कमी बुद्धीचे असतात का? ते मेहनती व कर्तुत्वान नसतात का ? त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून सर्व फुकटचे मिळते का? त्या शरद पौंक्षांना मला सांगायचे की हा तुझा गैरसमज आहे. मुळात एसी, एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये किती स्पर्धा आहे त्यासाठी किती रक्ताचा पाणी करावे लागते एकदा त्यांच्या परीक्षेचा निकाल बघ तेव्हा तुझे डोळे उघडतील तुझा गैरसमज दूर होईल पण मला माहित आहे. तुझे डोळे कधीच उघडणार नाही कारण त्यावर तू जातीयतेचे झापड लावलेला आहे. मुळातच पोंक्षे आणि त्याचे पुर्वज आणि विद्यमान वारसदारानी धर्माच्या नावाखाली हजारो वर्षापासून आरक्षण घेतले आहे आणि घेतही आहेत. त्याचे कारण ब्राह्मणाच्या पोटी ब्राह्मणास जन्मा येतो ओबीसी, एसटी, दलित नाही हे आरक्षण नाही काय ? हे पोंक्षे नी स्पष्ट करावे.

आरक्षणाच्या बाबतीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर 5 नोव्हेंबर 1948 साली संविधान सभेत म्हणतात हजारो वर्षापासून ज्या दलित, आदिवासी व ओबीसी वर्गाला धर्माच्या नावाखाली वंचित ठेवले त्यांचे शारीरिक, आर्थिक, मानसिक शोषण केले अशा वर्गाला इतर वर्गाच्या समान पातळीवर येईपर्यंत दिलेली संधी म्हणजे आरक्षण होय. म्हणून बाबासाहेबांनी भारतीय संविधान भाग 3 आर्टिकल 15 (4),16 (4) मध्ये शैक्षणिक व नोकरीसाठी ओबीसी, एसटी व एससी ना आरक्षण दिलेला आहे व आर्टिकल 330 व 332 मध्ये दलित व आदिवासींना राजकीय आरक्षण दिलेला आहे. हेच पौंक्ष सारख्या जातीवादाच्या डोळ्यात खूपत आहे. कारण शरद पौंक्षांना मनुस्मृति नुसार हे तिन्ही वर्ग ब्राह्मणाच्या बरोबरीला नको आहे. खरे बघितले तर आज जी शरद पौंक्ष्याची मुलगी पायलट झाली त्या बद्दल त्यानी ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानने आवश्यक होते. पण कृतघ्न असलेल्या व माय म्हणून मायवर चढणाऱ्या ### कडुन आम्ही अपेक्षाही करणार नाही. मनुस्मृती नुसार आमच्या तर सोडा ब्राह्मणाच्याही मुलीला शिक्षणाची बंदी असताना त्याकाळी ब्राह्मणा सहीत हिंदू धर्मातील सर्वच मुलीसाठी 1 जानेवारी 1948 ला पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात ज्योतिबा फुले यांनी मुलीसाठी पहिली शाळा काढली होती. त्या शाळेत शिकविणार्या देशातील पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले होत्या. मुलीसाठी शिक्षणाचा वसा घेतलेल्या फुले दाम्पंत्याना याच पौक्षाच्या पूर्वजांनी शेण व गोटे मारले होते. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान भाग 3 आर्टिकल 13,14, 15, 16, 21, A नुसार ब्राह्मणा सहीत सर्व मुलीला शिक्षणाचा अधिकार दिला आहे. ब्राह्मणा सहित हिंदू धर्मातील सर्व मुली व महिलांना अधिकार संरक्षण देण्यासाठी हिंदू कोड बिल मांडले होते. पण त्या बिलाला शरद पौक्षाच्या वैचारिक पुर्वजानी संसदेत विरोध केल्यामुळेच केंद्र सरकारने हिंदू कोड बिल मान्य केले नसल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. हे मानगुटी वर जातीयतेचे भुत घेऊन बसलेल्या व मा## सा# वर करणाऱ्या शरद पौंक्षांना कधीच कळणार नाही व आम्हाला त्यांच्या कडून तशी अपेक्षाही नाही.

आज देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जर नसते तर आज शरद पौक्ष ची मुलगी पायलट तर सोडा उलट त्याच्याच धर्मातील लोकांनी मनुस्मृतीनुसार पौंक्षाच्या मुलीला ## पुरते आणि भाकरी पुरते वापरले असते. उदा: मनुस्मृति कायदा अध्याय 2 श्लोक क्रमांक 67 “वैवाहिक व विधी स्त्रीणा संस्कारी वैदिक स्मृत,
पती सेवा गुरौ वासो गृहाथी अग्नि परिक्रिया”
अर्थ: मुलगी ब्राह्मणाची असो की हिंदू धर्मातील कोणत्याही जातीची असो तिचा जन्म पतीची सेवा करणे, पतीचे घर सांभाळणे, पतीचे लेकरे जन्मा घालते, सांभाळणे, सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करणे व पती हा कितीही चिन्हाल अर्थात व्यभिचारी जरी असला जुगारी जरी असला तरी पती हाच परमेश्वर मानुन त्याची रात्रंन दिवस सेवा करणे ह्यासाठीच पत्नीचा जन्म आहे व ह्या साठीच पोंक्षे च्या मुलीला वापरले असते. हे सर्व पौंक्षाला माहिती असूनही फक्त त्याच्या मेंदू मध्ये धर्मांधतेचा किडा असल्यामुळेच व त्याच्या ### मानसिकते मुळेच हे सर्व करत आहे.

पण त्या पौंक्षाला मला सांगायचे तुझी ### मानसिकता, तुझी संविधान विरोधी भूमिका ठेचून काढण्यासाठी ईथला आंबेडकरी समाज व आदिवासी बांधव निश्चित तयार आहेत ओबीसी बांधवावर मात्र शंका आहे असो यापुढे तू दलित आदिवासी ओबीसी बांधवांच्या हिताच्या आडवा व संविधानाच्या आडवा येशील तर तुला आम्ही जागीच आडवे करून ठेचून काढल्या शिवाय राहणार नाही एवढे मात्र नक्की तसेच मी शरद पौंक्ष यांच्या मुलगी कु.सिध्दीताई ना विनंती करतो की तुला भविष्यात फार मोठी व्हायची असेल तर तुझ्या वडिलांच्या डोक्यात जी मनुवादी विचारायची घाण आहे कृपया ती घाण तुझ्या डोक्यात घेऊ नको तुझे वडील जातीवादी मानसिकतेमुळे ओबीसी एससी एसटी व बहुजनांच्या भावनाशी त्यांच्या हक्काशी खेळत आहे पण तू तरी किमान त्या वाटेवर जाऊ नको आपल्या कामावर लक्ष दे हि विनंती जयभीम जय संविधान दादासाहेब शेळके मो.8766745644
राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना

हे विचार लेखकाचे खाजगी विचार असून महाराष्ट्र संदेश न्युज या विचाराना कधीही समर्थन देत नाही.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

14 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

16 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

2 days ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

2 days ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

3 days ago