कामगार महिलांना काम देतो असे सांगुन लुटणा-या टोळीस भारती विद्यापीठ पोलीसांनी केली अटक…..

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज!ऑनलाईन पुणे :- दि. २४/०६/ २०२३ रोजी फिर्यादी व त्यांचे सहकारी यांना चार अनोळखी इसमांनी आमच्या सोबत कामासाठी चला असे सांगून रोडवर चालणा-या प्रवासी चार चाकी गाडीतून जुन्या कात्रज बोगदयाचे पलीकडे घेऊन जाऊन प्रवासी गाडीतून उतरुन डोंगराकडे जाणारे कच्या रस्त्यावर घेऊन जाऊन फिर्यादी व त्यांचे सहकारी यांचे अंगावरील सोन्याचे दागिणे व मोबाईल हॅन्डसेट रोख रुपये असे ७६,०००/- रुपयांचे ऐवज जबरदस्तीने चोरुन नेले म्हणून फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४५८ / २०२३ भादंवि कलम ३९२.३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयाचे तपासामध्ये सदरचा गुन्हा आरोपी नामे १) नितीन साहेबराव चव्हाण, वय ३० वर्षे, रा. कांबळे बाई यांच्या बिल्डींग मध्ये भाडयाने सहयोग नगर, विठठलनगर, वारजे माळवाडी, पुणे मुळ रा. तामसा रोड, कृष्णानगर, गल्ली नंबर ५ ता. आर्धापुर, जि. नांदेड २) संतोष नागोराव कानोडे वय २० वर्षे, रा. सदर मुळ रा. मारुती मंदिरा शेजारी, आहिल्यादेवीनगर, ता. आर्धापुर, जि. नांदेड ३) सुकलाल बाजीराव गिरी, वय १९ वर्षे, रा. सदर मुळ रा. तामसा रोड, कृष्णा नगर, गल्ली नंबर ५. ता.आर्धापुर, जि. नांदेड ४) सुनिल नारायण गिरी, वय १९ वर्षे, रा. सदर, मुळ रा. तामसा रोड, विवेकगर, कॅनल जवळ, ता. आर्धापुर, जि. नांदेड यांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना नमुद गुन्हयामध्ये अटक करुन त्यांचे कडुन गुन्हयातील चोरी केले दोन सोन्याचे मंगळसूत्र, दोन जोड कानातील फुले असा एकूण ७६,०००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २. पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीषकुमार दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार शैलेश साठे, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे. अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

7 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

8 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

8 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

9 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

9 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

9 hours ago