१ जुलै ते ३१ जुलै महिन्याभरात ठाणे तहसिलदारां कडून अवैध वाळूउपसा करणाऱ्या बोटींवर धडक कारवाई.

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी मो.न.9892250402

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- मध्ये महसूल विभागाने अवैध वाळू उपसा करून वाहतूक करून तस्करी करणाऱ्यावर धडक कारवाई सुरू केली आहे. त्यात तहसिलदार इन ॲकशन मोड मध्ये आले आहे. १ जुलै ते ३१ जुलै महिन्याभरात सलग ५ वेळा वाळू माफियांवर कारवाई करुन वाळूमाफियांच्या मुसक्या महसूल विभागाने आवळल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यात वाळू माफियांचा सुळसुळाट सुटला होता. अश्यातच उपविभागीय अधिकारी विकास गजरे यांच्या उपस्थितीत नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांच्या माध्यमातून ही कारवाईची मोहीम राबविण्यात आली असून सोमवारी केलेल्या कारवाईत दोन बोटी पाण्याच्या बाहेर काढून त्या बोटींची विलेवाट लावून बोटी नष्ट करण्यात आल्या. एक मुंब्रा खाडी शेजारी तर दुसरी खारीगाव गणेश घाट अश्या दोन ठिकाणी ह्या बोटीची विलेवाट लावण्यात आली, केलेल्या कारवाई बद्दल जिल्हाधिकारी अशोक शिंनगारे व तहसिलदार युवराज बांगर यांच्याकडून नायब तहसिलदार दिनेश पैठणकर व तलाठ्यासह संपूर्ण टीमच कौतुक केले आहे. अश्या प्रकारच्या कारवाईने वाळूमाफियांना धाक बसेल असे उपविभागीय अधिकारी विकास गजरे व नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितले.

या कारवाई वेळी उपविभागीय अधिकारी विकास गजरे, तहसिलदार युवराज बांगर, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, मंडळ अधिकारी श्रीमती चौरे, रोकडे, जगताप अण्णा, महेंद्र पाटील, राजेश नरोटे, तलाठी सोमा खाकर, सतीश चौधरी, जाधव, खानसोळे, राहुल भोईर, कल्पेश ठाकरे, सतीश चौधरी, रोहन वैष्णव, रत्नदीप कांबळे, विजय गढवे, निलेश कांबळे, बसवराज गुंजीटे, ईश्वर जाधव, अरुण कासार, अनिल यादव, महिला धनश्री जाधव, मंगला खाडे, सुखदा शिरकर, मसूरकर, धोंडीबा खानसोळे, राहुल भटकर, राठोड उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

15 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

16 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

16 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

16 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

17 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

17 hours ago