शासनाच्या विज दर वाढीच्या विरोधात हिंगणघाट शहर समस्या संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढून विभागीय कार्यालय व विद्युत महामंडळाला निवेदन.

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन दिनांक 31 जुलै:- रोजी सोमवारला 11वाजता शासनाच्या विज दर वाढीच्या विरोधात हिंगणघाट शहर समस्या संघर्ष समिती च्या माध्यमातून मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना कार्यालयात तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले.

अगोदरच सर्व सामान्य जनता वाढती महागाई, प्रचंड बेरोजगारीने त्रस्त असताना सरकारकडून दिलासा मिळण्याची आशा असताना वीज ग्राहकांच्या खिशाला जास्तीचा भुर्दंड बसणार आहे. विद्युत वितरण कंपनीने घरगुती वापरासाठीच्या वीज दरात वाढ करून ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका दिला आहे. इंधन समायोजन आकाराच्या नावाखाली ही दरवाढ करण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या वीज देयकापासून ती प्रत्यक्ष अमलात आणली आहे. त्यामुळे जनतेचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकात संताप दिसून येते आहे.

त्यामुळे आज हिंगणघाट शहरात आंदोलन करण्यात आली. यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आलेले सर्वसामान्य जनतेला विज बिल कमी करण्यात यावे. तसेच शासनाने केलेली विज वाढ रद्द करण्यात यावी. यासाठी निवेदन करून निषेध नोंदवला व पुढील काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल अश्या सुचना करण्यात आल्या.

यावेळी निवेदन देण्याकरिता प्रामुख्याने शहरातील सामाजीक कार्यकर्ते सुनिल डोंगरे, मनोज रुपारेल, माजी नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार, माजी नगरसेवक प्रकाश राउत, विनोद झाडे, जितेंद्र कुकसे, गुड्ड शर्मा, संजय चव्हाण, दिपक माडे, बटुकभाई रुपारेल, राजेश जोशी, देवेन्द्र पडोळे, बंटी वाघमारे, राजाबाबु पचोरी, अनिल मुन, महेंद्र दिक्षीत, शाम ईडपवार, दर्शन बाळापुरे, साकीब शेख, चंद्रकांत ननंदकर, नितीन सिरसागर, धनराज कुंभारे, बालु वानखेडे, राजु रूपारेल, नानु करवा, संदिप मोहता, सुनिल आष्टीकर, इनायत खान, जितु पाठक, दिलीप ठाकरे, रमेश नवघरे, गुडु साखरकर, नामु सावंत, गोपाल पुरोहित सह शहरातील असंख्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

पाटण येथील वेगवेगळ्या विभागात यश प्राप्त केलेल्या नामवंताचे सत्कार व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोहळा संपन्न.

जिद्द आणि मेहनत यशा अंगी बाळगावी: तहसिलदार रुपाली मोगरकर यांचे प्रतिपादन. राहुल मसुरे जिवती तालुका…

56 mins ago

रामटेक राखी तलाव चौकात भीषण अपघात, भरधाव कारने पाणीपुरी हातठेल्याला उडवले, एक ठार तिन जखमी.

अनियंत्रीत कार पाणिपुरी हातठेल्याला उडवत गॅरेजमध्ये धडकली. पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज !…

2 hours ago

जिल्हास्तरीय शालेय सेपक टकरा स्पर्धेत राजुरा येथील इन्फंटच्या विद्यार्थ्यांनी पटकावला प्रथम क्रमांक.

इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल सीबीएससी च्या विद्यार्थिनिंची विभाग स्तरिय शालेय स्पर्धेकरिता निवड. संतोष मेश्राम…

2 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेली गटबाजी उमेदवाराचा करणार गेम?

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना…

3 hours ago

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

24 hours ago