पेण ते भाल एसटी पुर्वरत सुरू करा, प्रवाशांना होणारा त्रास थांबवा शब्दभेदी सामाजिक संस्थेच्या मागणीला यश.

अक्षय म्हात्रे, पेण तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पेण, ता.1:- पेण तालुक्यातील खारेपाट विभागात पेण ते भाल एसटीची सेवा सुरू असून दि.३० रोजी सदर एसटी प्रवाशी घेऊन जात असताना वाहकाला रस्त्याच्या साईटपट्टीचा अंदाज न मिळाल्याने एसटी मातीत खचून पलटी होताना थोडक्यात वाचली त्यामुळे एसटी प्रशासनाने एसटी सेवा रस्त्यामुळे बंद केली असल्याने येथील विद्यार्थ्यांसह असंख्य नागरीकांचे हाल होत आहेत. त्यामुळे ही एसटी सेवा पुर्वरत सुरू करावी यासाठी शब्दभेदी सामाजिक संस्था भाल यांच्या वतीने रायगड जिल्हा विभाग नियंत्रक दिपक घोडे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन दिले असता त्यांनी तात्काळ आधिका-यांना या निवेदनाची दखल घेऊन सदर रस्त्याची पाहणी करण्याचे आदेश दिले त्यानुसार एसटीचे वाहतूक नियंत्रक जोतीराम ठोंबरे, सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समिर म्हात्रे, शब्दभेदी संस्थेचे अक्षय म्हात्रे, शब्दभेदी सामाजिक संस्थेचे सचिव देवेंद्र, शब्दभेदी सा. संस्थेचे प्रसिद्धिप्रमुख ऋषिकेश म्हात्रे,वसंकेत भिडे, केतन म्हात्रे, अलंकार म्हात्रे, ओंकार ठाकूर यासह अन्य नागरीकांनी त्याठिकाणची पाहणी केली व त्यानुसार सदर अधिकारी यांनी रस्त्याची स्थिती योग्य आहे असे सांगितले.

या रस्त्याची पाहणी केल्यानंतर विभाग नियंत्रक दिपक घोडे यांनी या निवेदनाची दखल घेऊन या भागाच्या विद्यार्थी, महिला वर्ग व जेष्ठ नागरिकांसह इतरही प्रवाशांसाठी पेण ते भाल ही एसटी सेवा तातडीने सुरू केल्यामुळे सर्व प्रवाशांना आनंद व्यक्त केला आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

18 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

20 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago