गडचिरोली नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याच्या कॅबिनला वंचितच्या नेतृत्वात झोपडपट्टी धारकांनी घातले चप्पलाचे हार.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- गडचिरोली नगर पालिकेच्या हलगर्जी कारभार समोर येथ आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकात गडचिरोली नगर पालिका प्रशासन विरोधात संताप दिसून येत आहे.

महिनाभऱ्यापासून रहिवासी दाखले मिळण्यासाठी नगर परिषद गडचिरोली कार्यालयाच्या चकरा मारूनही दाखले न मिळाल्याने अखेर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व झोपडपट्टी धारकांनी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या कॅबिनला चप्पलाचा हार घालून रोष व्यक्त करण्यात आला. त्यामुळे नगरपालिका प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.

एकता नगर येथिल झोपडपट्टीधारकांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे बांधून देण्याचे पत्र मुख्याधिकारी पिदुरकर यांनी दिले होते परंतु अर्ज देऊनही एक महिना झाला तरी रहिवासी प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याने संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व झोपडपट्टीधारकांनी नगर परिषद गाठत मुख्याधिका-यांच्या कॅबिनला चपलाचे हार धालून मुख्याधिका-यांचा निषेध करत जोरदार घोषणा बाजी करून जो पर्यंत रहिवासी प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेतली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

2 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago