नराधम पित्याने आपल्याच 6 वर्षांच्या मुलासह पत्नीची केली निर्घृण हत्या. रत्नागिरी जिल्हातील मन सुन्न करणारी घटना.

रत्नु कांबळे, कोकण ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन रत्नागिरी:- जिल्हातून एक समाज मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे एका नराधम पित्याने आपल्याच 6 वर्षीय मुलासह पत्नीची निर्घृण हत्या केली या दुहेरी हत्याकांड समोर येताच संपर्ण जिल्हात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहे.

प्राप्त माहितीनुसार, रत्नागिरी जिल्हातील लांजा तालुक्यातील कोट गावामध्ये ही घटना घडली आहे. एका नराधम पित्याने आपल्याच मुलाची आणि पत्नीची निर्घृण हत्या केली. यात सोनाली चांदिवडे वय 26 वर्षे आणि प्रणव चांदिवडे वय 6 वर्षे अशी हत्या करण्यात आलेल्या आई आणि मुलाचं नाव आहे. आरोपी संदेश रघुनाथ चांदिवडे रा. कोट पाष्टेवाडी, ता. लांजा असे (संशयित) आरोपीचे नाव आहे.

मृतक सोनाली चांदिवडे या महिलेचा मृतदेह तिच्या घराच्या मागच्या बाजूला आढळून आला. तर प्रणव याच्या मृतदेह घरामध्ये आढळून आला. सोनालीच्या गळ्यावर धारधार शस्त्राचे वार करत हत्या करण्यात आली आहे. असे स्पष्ट दिसून येत आहे. या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवले आहेत. पोलिसांनी सोनालीचा पती संदेश चांदिवडे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 दिवसांपूर्वी ही महिला घरातून लांजा येथे निघून गेली होती. चार दिवसांपूर्वीच ती घरी परत आली होती. नवरा बायकोच्या भांडणामध्येच ही घटना घडली आहे. पतीनेच पत्नी आणि मुलगा या दोघांची हत्या केल्याचा दाट संशय आहे. पोलिसांनी फिर्याद दाखल करुन घेतली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं रवाना केली आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक मोबा 9766445348 / 7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

18 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

20 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago