नवगण शिक्षण संस्थेकडून करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कर्मचार्‍यांना न्याय देण्याची आ.संदीप क्षीरसागर यांनी केली मागणी.

उच्च, तंत्र शिक्षण सचिव, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक व कुलगुरूंना पत्र

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड:- जिल्ह्यातील नवगण शिक्षण संस्थेकडून त्यांच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयात कर्मचार्‍यांकडून सक्तीने एका महिन्याचा पगार वसुल करून मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे व या माध्यामतून या कर्मचार्‍यांवर अन्याय झालेला आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाला असून याची रितसर चौकशी करण्यात यावी व अन्याय झालेल्या या कर्मचार्‍यांना न्याय देण्यात व चौकशी पूर्ण होईपर्यंत या संस्थेवर प्रशासक नेमण्यात यावा अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी उच्च व तंत्र शिक्षण सचिव, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूंना यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

ज्या अन्याय झालेल्या सदरील कर्मचार्‍यांना मी आपल्या लढ्यात न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक स्तरावर आपल्या सोबत असेल व वारंवार निवडणुक आल्यानंतर आपल्यासोबत होणार्‍या आर्थिक व मानसिक नुकसानीपासून सुटका करण्यासाठी वेळोवेळी आपल्यासोबत असेल असे आश्वासनही आ.संदीप क्षीरसागर यांनी सदरील कर्मचार्‍यांना दिले आहे.
नवगण शिक्षण संस्थेकडून संस्थेचे प्रशासन चालवण्यासाठी एक असंवैधानिक समिती स्थापन केली असून समितीमध्ये डॉ.एस.एल गुट्टे, डॉ.एस.एस.जाधव, डॉ.व्ही.टी.देशमाने आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी बीड येथील सौ. के. एस. के महाविद्यालयात वेगवेगळ्या पदावर कार्यरत असूनही महाविद्यालयात न थांबता दररोज वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्थे अंतर्गत येणार्‍या महाविद्यालयांना तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दररोज भेटी देवून तेथील कर्मचार्‍यांवर दबाव आणून प्रतिवर्षी मार्चएंडींग म्हणून एक पगार सक्तीने, दम देवून वसूल करतात.

या प्रकारामुळे संस्थेतील सर्व कर्मचारी भयभीत झाले असून दडपणाखाली काम करत आहेत. अत्यंत तिव्रसंवेदनशिल कर्मचारी तर आत्महत्यासारखा टोकाचा विचार देखिल करत आहेत. सदरील समिती प्रत्येक दिवशी एका महाविद्यालयाला भेट देवून प्रत्येक कर्मचार्‍याला स्वतंत्ररित्या बोलवून पैशाची मागणी करत आहे. आपण पैसे न दिल्यास आपली बदली करण्यात येईल, पदोन्नती रोखण्यात येईल, वेतनवाढी रोखण्यात येतील, रजा मंजुर करण्यात येणार नाही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. यामुळे कर्मचार्‍यांचे खच्चीकरण होत असून प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. तसेच युजीसीकडून मिळणार्‍या विविध अनुदानात अपहार होत असून त्याची चौकशी करण्यात यावी, संस्थेतील बरेच पुर्णवेळ कर्मचारी यांना बंसल क्लासेस बीड व महात्मा गांधी खासगी रूग्णालय येथे जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडले जात आहे असे विविध गैरप्रकार नवगण संस्थेच्या प्रशासन समितीकडून करण्यात येत असून यामुळे संस्थेचे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. या कर्मचार्‍यांकडून आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे या प्रकरणात मदत करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले होते. यावर आ.संदीप क्षीरसागर यांनी तात्काळ पावले उचलून उच्च व तंत्र शिक्षण सचिव, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूंना यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार करून कोणत्याही परिस्थितीत या झालेल्या अन्यायाला तोंड देण्यासाठी मी कर्मचार्‍यांसोबत उभा आहे. शासन, प्रशासन तसेच न्यायालयीन प्रक्रियेतही कर्मचार्‍यांची साथ देणार असून कोणत्याही धमकीला भिण्याचे कारण नाही, मी तुमच्या सोबत आहे असा धीर दिला आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी कर्मचार्‍यांना होणार्‍या त्रासाचे आळेबंधन करणार आहोत.तसेच कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन न करण्याचे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी कर्मचाऱ्यांकना केले आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्य विकी वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने आज महाआरोग्य शिबिरचे आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…

11 mins ago

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

20 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago