समुद्रपूर पोलीसांकडून शिवणी पारधी बेडा येथे प्रभावी वाॅशआउट मोहिम, 1,13,300 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून केला नष्ट.

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपूर:- मागील काही दिवसांपासून समुद्रपूर अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात धडक कारवाई सुरू प्रभावी वाॅशआउट राबवित आहे. त्यामुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या आरोपीचे चांगलेच धागे दकावले आहे.

पोलीस स.पो.नी एस.बी. शेगांवकर सोबत पो.हवा. अरविंद येनुरकर व यांचेसहकासह एका सप्ताह मध्ये ४ वाॅशआउट मोहिम राबविण्यात आली असून शिवणी पारधी बेडा येथे प्रभावी वाॅशआउट मोहिम आज दिनांक 05 ऑगस्ट रोजी सपोनी एस.बी. शेगांवकर सोबत स.फौ.विक्की मस्के, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, पो.ना. राजेश शेंडे, पो.शि. वैभव चरडे, चा.पो.शि. रोशन उईके यांचेसह मौजा शिवणी पारधी बेडा येथे वाॅशआउट मोहिम राबविली असता, मोहिमे दरम्यान पारधी बेड्यालगत असलेल्या झुडपी शिवारात लपवून ठेवलेले व जमिनीत गाढून असलेले 21 लोखंडी व 26 प्लास्टीक ड्रम असे एकूण 47 ड्रममध्ये 1,900 ली कच्चा मोहा सडवा रसायण ड्रमसह जु.किं. 1,13,300 रू. चा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल मिळून आल्याने पंचासमक्ष मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून, संपुर्ण मुद्देमाल जप्त करून जागीच नाश करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक, डाॅ सागर कवडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी, रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार सपोनि एस.बी. शेगांवकर यांचे निर्देशाप्रमाणे, स.फौ. विक्की मस्के, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.शि. वैभव चरडे, चा.पो.शि.रोशन उईके यांनी केली.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

20 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

21 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago