मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. अमृत भारत योजनेंतर्गत हिंगनघाट रेल्वेस्थानकावर विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत योजनेंतर्गत 508 रेल्वेस्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने 76 स्टेशनवर ग्राहक सुविधां मध्ये सुधारणा करणारी योजना बनविली आहे. नागपूर मंडळात 15 स्टेशनचा समावेश आहे. त्या 15 स्थानकांची निवड करण्यात आली असून, यात वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम, हिंगणघाट आणि पुलगाव या रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. या रेल्वेस्थानकाचा पूर्णपणे कायापालट होणार असल्याची माहिती नोडल अधिकारी सुभेष वर्मा व स्टेशन प्रबंधक एच.जी. पाटील यांनी दिली.
हिंगणघाट रेल्वेस्थानक हे दक्षिण मार्गावर सर्वात मोठे स्थानक असून या मार्गावरून विविध एक्स्प्रेस गाड्या धावतात. तसेच हिंगणघाट शहराची व्याप्ती लक्षात घेत तब्बल 23 कोटी 72 लाख रुपयांतून स्थानकाचा पुनर्विकास होणार आहे.
6 ऑगस्टला विविध कार्यक्रम
येत्या 6 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी 508 रेल्वेस्थानकांवर डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून भूमिपूजन करणार आहेत. सकाळी 8 वाजतापासून विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. कार्यक्रमाला खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, माजी खासदार सुरेश वाघमारे, आ. वसंतराव आबंटकर यांच्यासह गणमान्य नागरिक, पत्रकार आदी मंडळी उपस्थित राहतील.
अमृत भारत स्थानक योजनेतून प्रवाशांना या नवीन सुविधा मिळणार आहेत
भारतीय रेल्वे बोर्ड द्वारे रेल्वे स्थानकाच्या जुन्या रस्त्याचे रुंदीकरण, विजेची चांगली सुविधा, पादचारी मार्ग सुधारणे, प्रवाशांना निवास, पार्किंग आणि बसण्याची चांगली सोय उपलब्ध करून देणार आहे. जुन्या रेल्वे स्थानकाचा वापर करून उच्च प्राधान्य प्रवासी संबंधित उपक्रम तयार केले जातील. याशिवाय, प्रवाशांना वेटिंग रूम क्लब तसेच हाय-एंड कॅफेटेरियाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रतीक्षालय लहान भागांमध्ये विभागले जाईल. ’रेल्वे’ स्थानकात काम करणार्या कर्मचार्याला लॉन्च आणि छोट्या बैठकीसाठी चांगली जागा उपलब्ध करून दिली जाईल.
महिला आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरविल्या जातील. अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत सर्व महिला आणि दिव्यांग व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छता गृहे व इतर सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत प्रवाशांना भविष्यात कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही अशा पद्धतीने कमी खर्चात रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहे. महिलांना आणि दिव्यांगांना बसण्यासाठी फर्निचर आणि आरामदायी कक्ष दिली जाईल. नूतनीकरण, सुशोभीकरण, औद्योगिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व रेल्वे स्थानके मॉडेल बनविण्याचा प्रयत्न केला जाईल.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…