चंद्रपुर येथे प्रशासकीय भवनच्या इमारतीत भीषण आग; बरेच शासकीय साहित्य अन् कागदपत्रे जळून खाक.

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- येथून एक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. येथे बस स्थानक परिसरात असलेल्या प्रशासकीय भवनाला भीषण आग लागल्याची घटना रविवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास समोर आली आहे. आग लागल्याची माहिती चंद्रपूर महानगर पालिका आणि महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अग्निशमन दलाला माहिती मिळताच तडकाफडकी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

या भीषण आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सुमारे 8 अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग दुसऱ्या मजल्यावर असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाला लागली आहे. या कार्यालयात कारवाई करून जप्त करण्यात आलेले अवैध तंबाखू, अंमली पदार्थ व इतर प्रकारचे साहित्य मोठ्या प्रमाणावर आहे. यातील बरेच साहित्य व कागदपत्रे आगीत जळून राख झाली असण्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

चंद्रपूर येथील या प्रशासकीय भवन इमारतीत शासनाचे विविध शासकीय कार्यालये आहेत. ज्याठिकाणी दररोज शेकडो लोक शासकीय कामाकरीता येत असतात. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जिल्हा माहिती अधिकारी, अन्न व औषधी प्रशासन विभाग ही महत्त्वाची कार्यालये या इमारतीत असुन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. महत्वाचे म्हणजे या इमारतीच्या अगदी शेजारीच जिल्हा न्यायालय, दुसऱ्या बाजुला रामनगर पोलीस ठाणे, मागील बाजुला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय असल्याने हा परिसर महत्त्वाचा व संवेदनशील समजल्या जातो.

पहाटे फिरण्यास निघालेल्या नागरिकांना प्रशासकीय भवनाच्या दुसऱ्या मजल्यातून मोठ्या प्रमाणात धुर निघत असल्याचे दिसल्याने त्यांनी शहानिशा केली असता तिथे आग लागल्याचे निष्पन्न झाले. काही जागरूक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला आगीची माहिती कळवली. आगीची तीव्रता व इमारतीचे महत्त्व लक्षात घेता मनपा व चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आगीचे नेमके कारण व वेळ अजून स्पष्ट झालेली नाही.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

7 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

7 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

8 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

8 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

8 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

9 hours ago