वादग्रस्त संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला पुण्यात भीम आर्मीचा विरोध, पोलिसांना केली ‘ही’ मागणी.

भीम आर्मी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची भेट घेतली आणि संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला परवनगी देऊ नये अशी विनंती त्यांच्याकडून करण्यात आली.

✒️राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी ( पवई )

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधांनानंतर राज्यातील वातावरण तापलंय. विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी केली होती. या कारणावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधकांमध्ये खडाजंगी बघायला मिळाली होती.

मात्र, राज्यात हे वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. पुण्यातील संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला भीम आर्मीतर्फे विरोध करण्यात आला आहे. याबद्दल या संघटनेने याबाबत पोलीसांना पत्रदेखील दिले आहे.

भीम आर्मी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची भेट घेतली आणि संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला परवनगी देऊ नये अशी विनंती त्यांच्याकडून करण्यात आली. पुण्यातील बालगंधर्व चौकात संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले जाणार आहे आणि यावेळी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेकही घातला जाणार आहे. संभाजी भिडेंच्या याच कार्यक्रमाला भीम आर्मीने विरोध दर्षवला आहे. जर पुण्यात संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक घातला आणि समर्थन आंदोलन केलं तर भीम आर्मी त्यांच्या विरोधात करणार जोरदार आंदोलन करणार, असा इशारा भीम आर्मीने दिला.

भीम आर्मीने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याने पुण्यात मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. यावेळी भीम आर्मी आणि संभाजी भिडे यांच्या समर्थकांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मागच्या काही दिवसांमध्ये अनेक वादग्रस्त विधाने केली. त्यांनी आधी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं, तर महात्मा फुलेंबद्दल त्यांनी अपशब्द वापरले. त्यांनी साईबाबांबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य केलं. ते म्हणाले होते की हिंदूनी साईबाबांची मुर्ती मंदिराबाहेर फेकून द्यावी.

त्यांच्या या ऑडियो क्लीप्स व्हायरल झाल्यावर राज्यातील वातावरण तापलं होतं. त्यांचे विधान जगासमोर आल्यावर त्यांच्या विरोधात ठिक ठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. त्यानंतर भिडेंच्या समर्थनार्थही मोर्चे आणि दुग्धाभिषेकाचं सत्र सुरु झालं होतं

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

4 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

4 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

5 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

5 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

5 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

6 hours ago