आलापल्ली आणि नागेपल्ली वासियांच्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी कुठे मुरत आहे?माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार काढणार मोर्चा.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- आलापल्ली आणि नागेपल्ली येथील नागरिकांसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून बनविण्यात आलेली नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली. पण अद्याप ही योजना सुरू झाली नाही किंवा ग्राम पंचायतकडे हस्तांतरित झाली नाही. त्यावरून या योजनेचे पाणी कुठे मुरत आहे. असा प्रश्न माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आविसचे नेते अजय कंकडालवार यांनी उपस्थित केला आहे. लवकरात लवकर घरोघरी पाणी पुरवठा सुरू केला नाही तर जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंग यांना निवेदन सादर केले.

प्राप्त महितीनुसार, पाणी पुरवठा योजनेअंतर्गत टाकण्यात आलेले पाईपलाईन हे निकृष्ठ दर्जाचे असल्याने ते पाईपलाईन फुटून गेलेले आहेत. १५ वा वित्त आयोगमधून ही नळजोडणी करण्यात आलेली आहे.परंतु नळ जोडणी करण्यात आलेल्या कंत्राटदाराकडून रीतसर काम करण्यात आलेले नाही.त्या जोडणीमध्ये वापरण्यात आलेले साहित्य हे निकृष्ठ दर्जाचे वापरण्यात आले आहेत. त्यामुळे जिथे तिथे पाईप फुटून पाणी वाया जात आहे.परिणामी नागरिकांना घराघरापर्यंत पाणी पोहचू शकत नाही.तसेच आलापल्ली येथील पाणीपुरवठा योजनेची पुर्ण कामे झालेली नाही, प्रत्येक घराघरात पाणी पोहोचले नाही. तरीसुद्धा सरपंच व ग्रामसेवकाने ग्रामपंचायत मधील कोणत्याही सदस्याला, कमिटीला विश्वासात न घेता, ग्रामसभेत न ठेवता स्वतःच्या मर्जीने काम पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. नळ जोडणी देताना अनेक ठिकाणी नालीच्या मधोमध व सांडपाण्याच्या मध्ये पिण्याच्या पाण्याचे पाईप लाईन टाकण्यात आले.आलापल्ली येथे नळ जोडणीचे काम करणाऱ्या कंत्राटदार यांचेमार्फत काम पाहणाऱ्यांनी लाभार्थीवर जास्तीचे पैसे दिल्याशिवाय पाईप जोडणी करून दिली नसल्याचा आरोप काही नागरिकांची केला आहे. घरोघरी पाणी देण्याचे शासनाचे, जिल्हा परिषदचे स्वप्न असतांना सहा महिन्यापासून कामे पूर्ण झाले असताना लोकांना घरोघरी पाणी न मिळणे योग्य नाही. या कामावर देखरेख करणारे उपअभियंता रामटेके अभियंता व वरिष्ठ अधिकारी कोणत्याही कामावर न जाता मोजमाप पत्रिकेत नोंद घेऊन त्यांचे बिल काढण्यात आले आहे. एवढी मोठी योजना पूर्ण होऊनही लोकांना पाणी मिळत नसल्याने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून जे पदाधिकारी किंवा अधिकारी दोषी असेल त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कांकडालवार यांनी केली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

मिरा भाईंदर: माणसाला माणूस बनवण्याचा करेक्ट कार्यक्रम म्हणजे वर्षावास: भदंत शांतिरत्न यांचे प्रतिपादन.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…

2 hours ago

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना वाहली श्रद्धांजली.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…

2 hours ago

हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…

3 hours ago

पुलगाव येथे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानीक गुन्हे शाखेची धडक कारवाई, लाखोंचा माल जप्त.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…

3 hours ago

सांगली सेवक कामगार संघटने कडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत घेतली भूमिका.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…

4 hours ago

चंद्रपूर: वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…

4 hours ago