✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी ✒️
नाशिक:- शहरात दिवसानदिवस क्राईमचा ग्राफ वाढत आहे. त्यामुळे पोलिसाची कसोटी लागत असल्याचे समोर येते. त्यातच जिल्हात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्र साठा मिळत असल्याची सूत्रा कडून माहिती मिळून आली. अशीच एक बातमी समोर येत आहे.
अंबड पोलिसांनी सिडको परिसरात दोन विविध ठिकाणी सापळा रचत चार संशयितांना जेरबंद करीत त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह धारदार हत्यारे व एक दुचाकी हस्तगत केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अंबडचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर कोल्हे व पोलिस शिपाई प्रशांत नागरे यांना पाथर्डी फाटा परिसरात दोन संशयित व्यक्तींकडे गावठी कट्टा तसेच अन्य हत्यारे असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस पथकाने पाथर्डी फाटा परिसरात सापळा रचत संशयित ललित गांगुर्डे वय 29 वर्ष रा. वावरेनगर, अंबड लिंक रोड, प्रशांत खतोडे वय 34 वर्ष रा. संगमनेर यांना पकडले. त्यांच्याकडे गावठी कट्टा, जिवंत काडतूस सापडले. दुचाकी व दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाइल असा एकूण एक लाख 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल केला.
दुसर्या घटनेत दि. 29 उत्तमनगर येथे प्रणव हिरे वय 19 वर्ष, रा. दत्त चौक, नवीन नाशिक), रवि पांजगे वय 19 वर्ष, रा. दत्त मंदिरासमोर, नाशिक हे धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याबाबतची माहिती पोलिस शिपाई राकेश राऊत यांना मिळाल्याने उपनिरीक्षक सुनील बिडकर यांच्या पथकाने सापळा रचत तलवार जप्त केली आणि गुन्हा दाखल केला.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…