जीवनात सर्वाना हसवणे आणी हास्यमय स्वत:जगणे म्हणजे श्यामभाऊ अलोणीचं: माजी राज्य मंत्री अशोक शिंदे

स्व. श्यामभाऊ अलोणी श्रध्दांजलि कार्यक्रमाचे आयोजन प्रसंगी प्रतिपादन

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- जीवनात मनुष्याने आनंदित कसे असावे व परिस्थितीचा सामना करुन त्यावर मात कशी करावी याचा परिपाठ भगवान श्रीकृष्ण यांनी भगवत् गीतेच्या माध्यमातून सांगितले आहेचं तोचं जीवनाचा सार समजून स्व.श्यामभाऊ दिवाकरराव अलोणी यांनी आपल्या संसारात असतांना सुध्दा सामाजिक, राजकीय, धार्मिक, व्यापारिक, व्यवसायिक, अशा अनेक जबाबदारीवर असलेल्या सर्व स्तरावरील सामान्य माणसापासून वरिष्ठ असलेल्या वडीलधा-या मंडळीला हसविणे व स्वतः ही हास्यमय जीवनाचा आनंद घेणे हा एक प्रत्यक्ष अनुभवाचा शिलेदार स्व. श्यामभाऊ अलोणी हे व्यक्तिमत्व अफलातून होते असे मत श्रधांजलि पर अध्यक्षीय भाषण करतांना माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी व्यक्त केले.

भारतीय युवा संस्कार परीषद तथा राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय युवा संस्कार परीषदेचे आधारवड पी.व्ही. टेक्सटाइल चे सेवानिवृत्त मँनेजर स्व.श्यामभाऊ अलोणी श्रध्दांजलि कार्यक्रम अलोणी निवासस्थान रेलवे स्टेशन रोड येथे रोज शनिवारला संपन्न झाला, यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार राजु तिमांडे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापति अँड.सुधीर कोठारी, भारतीय युवा संस्कार परीषदेचे केन्द्रीयध्यक्ष डाँ. प्रा.शरद कुहीकर, डाँ.प्रा. उषाताई साजापुरकर, माजी पंचायत समिति सभापती वासुदेवराव गौळकार, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष विजय बाकरे, माजी स्टेशन मास्टर नानाजी सुरशे, वर्धा नागरिक बँकेचे संचालक भिमसागर खैरकर, जेष्ठ पत्रकार सतिश वखरे, चिन्मय मिशनचे संयोजक, मुख्याध्यापक मिलींद मुळे, भा.बहु.युवा संस्कार मंडळाचे डाँ. शरद मद्दलवार, शेतकरी मंचाचे डाँ. पाडुरंगजी भगत, रिपाईचे रामु मेंढे, शिवसेनेचे अरुण जांभुलकर, राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन चेतन काळे, आनंदवन मित्रपरीवाराचे हेमंत कुलकर्णी, नाना ढोक, नरहरि थुल आदींनी श्रधांजलि अर्पण केली.

याप्रसंगी श्रध्दांजलि पर गीत कार्यक्रम संयोजक अमोल भोंमले, गुरुजी यांनी गायीले, तर सुत्रसंचालन प्रदीपकुमार नागपुरकर यांनी केले. यावेळी फिल्म दिग्दर्शक नितीन देसाई, निसर्ग प्रेमी कवीवर्य ना.धो. महानोंर, भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्या मानस कन्या ग्रामसेवा मंडळ गोपुरी अध्यक्ष श्रीमती करुणाताई फुटाणे, यासह सर्वाना सरतेशेवटी दोन मिनिटे मौन पाळून शांतीमंत्राने श्रधांजलि अर्पण करण्यात आली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

1 hour ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

23 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago