हिंगणघाट: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला कृती समितीचे ७० व्या दिवशी काळे झेंडे दाखऊन आंदोलन.

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्या करीता राज्य सरकार द्वारा घोषित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहर मध्ये होण्या करीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महीलांकृती समितीचा संघर्ष भर पावसाळ्यात पण सुरू आहे.

हिंगणघाट शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित धरने आंदोलनाचा काल ७० वा दिवस होता. हिंगणघाट शहरात मेडिकल कॉलेज व्हावे या जनतेच्या मागणी करीता शेकडो महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून मागील अनेक दिवसापासून आंदोलन करत आहे. या महिलांच्या कार्यक्रमात ठरल्याप्रमाणे दर रविवारी काही वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून शासन आणि प्रशासनाने हिंगणघाट शहरात शासकीय वैदकिय महाविद्यालय निर्माण करण्यासाठी ह्या रविवारी महिलांनी काळे झेंडे दाखवुन सरकार आणि स्थानिक प्रतिनिधी चे लक्ष वेधले.

या आंदोलनात वेगवेगळे वळण, देऊन टप्पे आणि यशही मिळाले, त्यामध्ये वर्धा आणि अमरावती चे ठिकाणाला तात्पुरती स्थगिती हे प्रमुख उपलब्धि; तसेच विरोधी पक्ष नेते (प्रदेशाध्यक्ष ) श्री जयंत पाटील व हिंगणघाट विधानसभेचे आमदार समिर कुणावर ह्यांनी विधान सभेत हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट मध्ये जनतेची मागणी आहे ह्या संबंधी प्रश्न केला. त्यावर प्रतिउत्तर म्हणून उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस ह्यांनी समिती स्थापित करून कॉलेज चे ठिकाण निश्चित करण्यात येणार असल्याचे संगितले. अशा रीतीने अशावाद पुर्ण पल्ववित होताना दिसत आहे.

यावेळी महिला कृती समितीच्या सीमा मेश्राम ह्यांनी आंदोलन तसेच पुढे रेटायचे ठरवले. त्यानुसार ७० व्यां दिवशी महिलांनी काळे झेंडे दाखऊन प्रशासन आणि स्थानिक लोक प्रतिनिधीं विषयी रोष दाखवला. वैद्यकीय महविद्यालय हिंगणघाट मध्ये येण्यास फक्त सदनात प्रश्न मांडून नाही तर सुनियोजित कृती कराव्या अन्यथा आंदोलन पुढे ढकलण्याचा इशारा शासकीय वैद्यकीय महविद्यालय महीला कृती समिती नी दिला. यावेळी काळा झेंडा हा विरोध चिन्ह असून महिलांनी ते दर्शवले.

यामध्ये प्रामुख्याने सावित्रीच्या लेकी सामाजिक संस्थाच्या सीमा आर मेश्राम, सुचिता कांबळे, ज्योत्स्ना म्हैसकर, सिंधु दखणे, नूतन धाबर्डे, भारती वैद्य, भागेश्री नगराळे, सुषमा पाटील, मीरा फुलमाळी ,प्रमिला कुंभारे, सुकेशनी डांगे, मोनाली फु गालझेले, रूपा सोरदे, अनिता साखरे, वंदना भगत, योजना वासेकर, लीना नगराळे, अनिता साखरे, नंदिनी मांडवे, वैशाली वासेकर,प्रीती चव्हाण,लता साखरकर इ. उपस्थित होत्या तर पुरुषां पैकी, तन्मय वासेकर, श्याम इडपवर, हर्षल गुण्डे, रुपेश लजुरकर सुरेन टेंभुर्ने, संदेश मून इत्यादी उपस्थित होते.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

54 mins ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

23 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago