✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपूर:- पोलीस स्टेशन येथील डि.बी. पथकाने अवैध दारू वाहतुक व सट्टा जुगारवर केलेल्या विविध कार्यवाही अंतर्गत देशी, विदेशी व मोहा दारू ची वाहतुक करणा-या व सट्टा जुगारचा अवैध व्यवसाय करणा-या गुन्हेगारांवर कार्यवाही करून त्यांचेकडून 05 मोटर सायकलसह 3,80,700 रू. चा मुद्देमाल जप्त केला.
समुद्रपूर पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त ठाणेदार श्री. एस.बी. शेगांवकर व डि.बि. पथकाचे पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.अं. वैभव चरडे यांनी समुद्रपूर परीसरात अवैध दारू विक्री करीता वाहतुक करणारे 05 गुन्हेगारांवर दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही केली आहे. सदर कार्यवाहीमध्ये आरोपी नामे 1) शेखर गजानन कापटे, रा. संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट याचे ताब्यातून मोहा दारू व मोपेड वाहन असा 86,400 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला., 2) पंढरी राजेराम बावने, रा. वार्ड क्र 15 समुद्रपूर याचे ताब्यातून देशी दारू व मोटर सायकलसह 50,960 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 3) सुधीर अनिल तायवाडे रा. संत चोखोबा वार्ड हिंगणघाट याचे ताब्यातून मोहा दारू व मोपेड असा 94,800 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 4) शैलेश मोतीराम जांगळेकर रा. वार्ड क्र 3 जाम याचे ताब्यातून विदेशी दारू व मोपेड असा 68,000 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 5) रोशन प्रभाकर झाडे रा. डांगरी वार्ड हिंगणघाट याचे ताब्यातून मोहा दारू कि. 3,200 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच 6) सोनू शेषराव खडतकर रा. वायगाव गोंड ,विजय शेंडे रा.हमदापुर यावर सट्टा जुगार बाबत कार्यवाही करीत मोटर सायकलसह 77,340 रू. चा मुद्देमाल जप्त केला. याप्रकारे विविध कार्यवाही अंतर्गत 3,80,700 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार सपोनि. एस.बी. शेगांवकर यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नि. पंकज मसराम, स.फौ. विक्की मस्के, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.शि. वैभव चरडे यांनी केली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…