हिंगणघाट शहरात शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे निर्मितीच्या मागणीसाठी 70 दिवसांपासुन सुरू, क्रांती मशाल मार्च संपन्न.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथे शासकिय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे मागणी करिता गेल्या २ महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून विविध प्रकारचे आंदोलन केल्या जात आहे. काल दि.९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून पुन्हा शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचे मागणीकरीता वणा संवर्धन समितीचेवतीने शहरात क्रांती मशाल मार्च चे आयोजन करण्यात आले.

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाट शहरात शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे निर्मितीचे मागणीसाठी गेल्या ७० दिवसांपासुन विविध आघाड्यावर मोठे जनआंदोलन सुरु आहे.
यात विवीध संघटनांचा सहभाग असून याप्रकरणी राजधानी मुंबई पर्यंत धडक देण्यात आली आहे.
राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा आमदार समीर कुणावार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रश्न उचलून धरला होता. शिवसेनेचे दानवे यांनी सुद्धा यासाठी प्रयत्न केले.

वर्धा जिल्ह्यात प्रस्तावित असलेले वैद्यकिय महविद्यालय हिंगणघाट शहरातच व्हावे या मागणीला हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी (रेल्वे) विधानसभेचे मोठे जनसमर्थन प्राप्त होत असून
तळागाळातील सामान्य जनतेची सुद्धा हिच मागणी आहे. लोकप्रतिनिधी सुद्धा आता यासाठी सक्रीय झाले असून सर्व राजकिय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते सुद्धा पुढे सरसावले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून आज वना नदी संवर्धन समितीकडून क्रांती मशाल मार्च चे आयोजन स्थानिक डॉ.आंबेडकर चौक ते विठोबा चौक मार्गे कांरजा चौक येथील जय जवान पुतळ्यापर्यत आयोजन करण्यात आले. मार्च मध्ये ठरल्याप्रमाणे प्रत्येक चौकात क्रांतिकारी नेत्यांना मानवंदना अर्पित केली गेली. प्रथम इंदिरा गांधी चौकात त्यांच्या पुतळ्याला, सुभाष चौक येथे नेताजी सुभाष चंद्र बोस, जयस्तंभ चौक येथे महात्मा गांधी ह्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून खऱ्या अर्थाने क्रांती दीन साजरा केला गेला.

क्रांती मशाल मार्च मध्ये माजी सैनिक कल्याणकारी टॄस्ट हिंगणघाट, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महीला कृती समिती, ग्रामराज्य सामाजिक ग्रामीण विकास शिक्षण सेवा संस्था ह्यांचा पुढाकार होता. शहरातील इतर सामाजिक संघटनांनी आपला सहभाग नोंदवित या क्रांती मशाल मार्च मध्ये भाग घेतला. ह्यामध्ये प्रामुख्याने आधार फाउंडेशन कडून राजश्री विरुळकर, सावित्रीच्या लेकी कडून सीमा मेश्राम, दंत चिकित्सक श्वेता वागदे ह्यांनी जयस्तंभ चौक येथे शहरात वैद्यकीय महविद्यालय यावे ह्यासाठी कडकडीचे मनोगत व्यक्त केले. या आंदोलनाची ज्योत पेटत राहावे यासाठी क्रांतिकारी लोकांपासून प्रेरणा घेत महिलांनी आमदार कुणावर ह्यांना सभागृहात फक्त कॉलेजचा प्रश्नच नाही तर संपूर्ण कॉलेज यायला पाहिजे असा पाठपुरावा आमदार यांनी घ्यावा असे आग्रहाचे आव्हान महिलांनी तत्परतेने केले. तसेच पुरुषांपैकी अनीलं भोंगाडे, संतोष तीमांडे, बाबाराव तेलरांघे सर ह्यांनी क्रांतिकारी मते मांडली. या कार्यक्रमाचे आयोजक रुपेश लाजूरकर ह्यांनी आभार प्रदर्शन केले.

ह्या प्रसंगी राजश्री बांबोळे, निर्मला भोंगाडे, स्वेता वागदे , नंदिनी मांडवे, योजना वासेकर, लीना नगराळे, वैशाली वासेकर, सुषमा पाटील, सुजाता रामटेके, वंदना भगत, श्रुती रामटेके, माजी सैनिक कल्याण कारीट्रस्ट अध्यक्ष पुंडलिक बकाने, सचिव अजाब भोंग, उपाध्यक्ष सुधाकर दांडेकर, दिलीप वाघमारे, संदेश मून, सुधाकर जामखुटे, गजानन दातारकर, विलास बोरकर, किरन जोशी, महेंद्र लाखे, अतुल शेटे, सतिश तिमांडे, संतोष करपे, शत्रुघ्न ठाकरे, सिताराम भुते, नरेंद्र पोहनकर, विनय मोरे, विनोद भुते, मारोती माहाकाळकर, हर्षल गुंडे, सुधाकर दांडेकर, दिपक कापसे, विजय तामगाडगे, सुरेंद्र टेंभुरने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

49 mins ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

23 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago