हिंगणघाट नगर पालिकेच्या नाली बांधकामात हलगर्जी पणा, घेणार काय एखाद्याचा जीव?

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दिनांक: १० ऑगष्ट:- ला सकाळी ठीक ०८:३० वा. संत गोमाजी वार्ड, हिंगणघाट येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तालुका प्रमुख सतीश धोबे यांच्या नेतृत्वात वार्डातील माजी नगरसेवक शंकर मोहमारे यांच्या उपस्थितीत नगरपरिषद च्या वतीने दलित नागरिक उत्तर सुधार योजने अंतर्गत श्री. बावणे ते श्री. सोनकुसरे यांच्या घरापर्यंत सिमेंट नाली बांधकाम सुरू आहे. सदर नाली बांधकामानिमित्त वार्डातील जुनी नाली खोदून जवळजवळ ४”×४” फूट नालीचे खोदकाम करण्यात आले. सदर नालीचे खोदकाम झाले असल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना आपल्या घरून रस्त्यावर येण्यासाठी कुठलीही पर्याय व्यवस्था नगर परिषदेच्या वतीने केली नाही. त्यामुळे काही लोकांचे जीवनमान १०”×१०” च्या खोली मध्ये बंदिस्त झाले आहे. तसेच घरातील वृद्ध व शाळकरी मुले त्या खोदकाम करण्यात आलेल्या नालीच्या ठिकाणी पडून ते किरकोळ जखमी सुद्धा झाले आहे. त्यांच्या घरचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. त्यांना पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नाही. प्रशासनाचे अडीलट्टू धोरणामुळे सदर नालीचे बांधकाम रखडले आहे. सर्व वार्ड वासियांची तक्रार आहे की, एक तर ही नाली तातडीने बांधण्यात यावी किंवा बुजवण्यात यावी जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही.

सदर नालीच्या ठिकाणी श्री. दिलीप वैद्य यांनी नगरपरिषद हिंगणघाट यांना लेखी स्वरुपात तक्रार सुद्धा करण्यात आली आहे. सदर नालीची वार्डातील समस्त नागरिक तक्रार करीत होते. जर सदर नालीचे बांधकाम त्वरित सुरू केले नाही तर, वार्डातील समस्त नागरिक व शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल. कुठलाही अनुचित प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. त्यावेळेस शिवसेनेचे उप तालुका प्रकाश अनासाणे विभाग प्रमुख नितीन वैद्य, दिलीप वैद्य, सुभाष तडस, सचिन मडवी, विनोद चापले, आतिश गजभिये, अशोक भगत, लक्ष्मण भगत, सौ.माधुरी वैद्य, सौ.योगिता गजभिये, सौ.वंदना चरडे, सौ.मीनाबाई जोशी, सौ.नीताताई मडावी, इंदिराताई शिंदे, अनिता मेश्राम, चित्राताई मेश्राम हे उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

21 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

23 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago