नागरिकांनो सावधान: चंद्रपूर जिल्हात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत बेरोजगारांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय.

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- नागरिकांनो सावधान जिल्हात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत बेरोजगारांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याची खळबळजनक खुलासा समोर आला आहे.

किमान धन आरोग्य योजने अंतर्गत सुपरवायझर या पदावर नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवून एका बेरोजगार युवकांची तब्बल 4 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी भादवी कलम 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. मिलींद वासुदेव बुरांडे वय 40 वर्ष रा. चामोर्शी जि. गडचिरोली, किशोर जगताप वय 42 वर्ष रा. जळका ता. वरोरा असे अटकेतील आरोपींचे नाव असून अन्य एक फरार आरोपीचा तपास सुरू आहे. तर विनायक भाऊ पिपरे वय 47 वर्ष रा. कसरगट्टा ता. पोंभुर्णा असे फसवणूक झालेल्या बेरोजगाराचे नाव आहे.

मिलिंद बुराडे याने विनायक पिपरे याला आपण किमान धन आरोग्य योजनेमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा सुपरवायझर असल्याची माहिती दिली. तुलाही नोकरी लावून देतो. परंतु, कंपनीत साडेआठ लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले. विनायक नोकरी मिळेल या उद्देशाने पैसे देण्यास कबुल झाला. त्याला मिलिंद बुराडे यांनी चंद्रपूर येथे एका हॉटेलमध्ये बोलवले. यावेळी मिलिंदसह किशोर जगताप व अन्य एक व्यक्ती होता. या तिघांनी त्याच्याकडून नोकरी लावून देण्यासाठी 4 लाख 65 हजार रुपये घेतले. मात्र बरेच महिने झाल्यानंतरही नोकरी लावून न दिल्याने विनायकने त्यांना विचारपूस केली. यावेळी टाळाटाळ करण्यात येत होती. त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून मिलिंद बुरांडे व किशोर जगताप यांना बुधवारी अटक केली. पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे करीत आहेत.

आरोपींवर वरोरा, नागपूर ठाण्यातही गुन्हे दाखल
पोलिसांनी अटक केलेल्या किशोर जगताप याच्यावर वरोरा, चंद्रपूर रामनगर तसेच नागपूर पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. या गुन्ह्यात पुन्हा आरोपी असण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तवली आहे. पुन्हा किती लोकांची फसवणूक यांनी केली याचा तपास पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

50 mins ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

23 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago