हिंगणघाट तालुक्याला जिल्हा घोषित करा: माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याला जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावे अशी मागणी माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत अशोक शिंदे लवकरच मुंबई येथे शिष्टमंडळासह जावून ही मागणी शासनाकडे रेटून धरणार आहेत.

अशोक शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुका हा लोकसंख्या, संसाधन, व्यापार आदी दृष्टीने जिल्हा होण्यासाठी सक्षम आहे. हिंगणघाट व समुद्रपुर तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याचे ठिकाण हे फार दुरचे त्रासाचे आहे. येथील बाजारपेठ, कृषी उत्पन्न बाजार समिती, कापड निर्मिती कारखाना, औद्योगिक प्रगती या सर्व बाबी हिंगणघाट जिल्हा म्हणुन उभा राहण्यास सक्षम आहे.

सध्या राज्यात कोणकोणते जिल्हे होऊ शकते किंवा शासन प्रशासनाच्या दृष्टीने योग्य ठरणार याची चाचपणी सुरू आहे. हिंगणघाट वासीयांच्या वतीने येथील सर्व घटकांना सोबत घेवुन अभ्यास पुर्ण पध्दतीने आपणांस भेटून आपल्याला या बाबीचे गांभिर्य लक्षात आणुन देण्याचा प्रयत्न करणार आहोत असे अशोक शिंदे यांनी या पत्रात नमूद केले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

13 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

14 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago