Ø शेतकऱ्यांकडून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज आमंत्रित
Ø फळे, फुले, मसाला पीक लागवड व जुन्या फळबागांचे होणार पुनरुज्जीवन
सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळ पिकांच्या जुन्या बागांचे पुनरुज्जीवन या बाबींचा समावेश आहे.
राज्यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
कट फ्लावर्सकरीता अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी खर्च मर्यादा 1 लक्ष रुपये आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रु. प्रति हेक्टरी अनुदान मर्यादा असणार आहे. तर इतर शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर खर्च मर्यादा 1 लक्ष रुपये असून एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 25 हजार रु. प्रति हेक्टरी अनुदान मर्यादा असणार आहे. कंदवर्गीय फुलांसाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांकरीता प्रति हेक्टरी खर्च मर्यादा 1 लक्ष 50 हजार रु. आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 60 हजार रु. प्रती हेक्टरी अनुदान मर्यादा. तर इतर शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी खर्च मर्यादा 1 लक्ष 50 हजार रु. असून एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल 37 हजार 500 रु. प्रति हेक्टर अनुदान मर्यादा असणार आहे.
सुटी फुलेकरीता अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी खर्च मर्यादा 40 हजार रु. आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 16 हजार प्रति हेक्टरी अनुदान मर्यादा. तर इतर शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी खर्च मर्यादा 40 हजार रु. असून एकूण खर्चाच्या 25 टक्के किंवा कमाल रु.10 हजार प्रति हेक्टर अनुदान मर्यादा आहे. मसाला पीक लागवडीकरीता, बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिकांसाठी प्रति हेक्टरी खर्च मर्यादा 30 हजार रु. आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 12 हजार रु. प्रति हेक्टर अनुदान मर्यादा असणार आहे. बहुवर्षीय मसाला पिकांसाठी प्रति हेक्टरी खर्च मर्यादा 50 हजार रु. आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 20 हजार रु. प्रति हेक्टरी अनुदान मर्यादा असणार आह.
विदेशी फळपीक लागवडीकरीता, यामध्ये ड्रॅगनफ्रुट, अंजीर व किवीसाठी प्रती हेक्टरी खर्च मर्यादा 4 लक्ष रु. आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लक्ष 60 हजार रु. प्रति हेक्टर अनुदान मर्यादा आहे. स्ट्रॉबेरीसाठी प्रति हेक्टरी खर्च मर्यादा 2 लक्ष 80 हजार रु. तर एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल रु. 1 लक्ष 12 हजार प्रती हेक्टर अनुदान मर्यादा आहे. पॅशनफ्रुट, ब्लूबेरी, तेंदुफळ व अवॅकॅडो पिकांसाठी प्रति हेक्टरी खर्च मर्यादा 1 लक्ष रु. आहे. एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 40 हजार रु. प्रति हेक्टर अनुदान मर्यादा आहे.
जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रति हेक्टरी खर्च मर्यादा 40 हजार रु. आहे. एकूण खर्चाच्या 50 टक्के व जास्तीत जास्त रुपये 20 हजार प्रति हेक्टर अनुदान मर्यादा असणार आहे.
विदेशी फळे, फुले, मसाला लागवड करण्यास इच्छुक व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या संबंधित कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…