हिंगणघाट नगर पालिकेच्या शाळेत शिक्षक भरतीत मोठा घोटाळा? चौकशी करून कारवाई करावी.

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातून शिक्षण क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील नगर पालिका द्वारा चालवण्यात येत असलेल्या शहरातील एका प्रसिद्ध शाळेत शिक्षक भरतीत मोठा प्रमाणात घोटाळा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नगर पालिका प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. या घोटाळा कुणाच्या आशीर्वादाने करण्यात आला याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी शिक्षण क्षेत्रातील अनेकांकडून मागणी होत आहे. याबाबत शहरातील काही शिक्षकांनी महाराष्ट्र संदेश न्युजला दिलेल्या निवेदनात अनेक खळबळ जनक आरोप केले आहे.

शाळा ही समाजाचा सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे, तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकवल्या जातात. तिथे मुलांना नवे काहीतरी शिकण्याची संधी मिळते. स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. शाळेमुळे सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक विकास, सामाजिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास व नैतिक विकास होत असतो. पण तीच शाळा नैतिकता सोडून काम करत असेल तर दाद मागायची तरी कुणाला.

हिंगणघाट शहरात असलेल्या नगर पालिकेच्या जी.बी.एम.एम ज्युनियर कॉलेज मध्ये गेल्या काही वर्षांपासून भ्रष्ट कारभाराची कीड लागली आहे. त्यामुळे भ्रष्टतंत्र जोमात आणि विद्यार्थांचे शिक्षण कोमात असे दिसून येत आहे. ज्यात जीबीएमएम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्रशासन आपल्या मनमानी व मनमर्जी कारभाराद्वारे विषयाचा अनधिकृत नियमबाह्य कारभार निर्माण करून निधीची लूट करीत आहे. अशा गंभीर आरोप दोन शिक्षकाने लावला आहे. एक शिक्षित पिढी घडवण्याचे काम हे शिक्षक करत असतो पण त्या शिक्षण क्षेत्रात देखील भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. त्यामुळे अशा वेळी विद्यार्थी कसे घडणार अशा प्रश्न निर्माण झाला आहे?

प्राप्त माहितीनुसार, राज्य शासनाने 2017 मध्ये जी.बी.एम.एम शाळेच्या प्रशासनाला ज्युनियर कॉलेज मधील रिक्त पदांची माहिती शाळा प्रशासनाला वारंवार सूचना देऊन मागितली होती. या सूचनेनंतर पण कॉलेज प्रशासनाने शासनाच्या पवित्र पोर्टल प्रणालिकडे शाळेत रिक्त असलेल्या शिक्षक पदाची माहिती पाठवली नाही त्यामुळे शाळेने शासनाच्या दिशा निर्देशांचे सर्हास उल्लघन केले.

या रिक्त पदांची माहिती शासनाला पाठवली नाही म्हणून शासनाकडून जीबीएमएम कॉलेज मध्ये कोणतीही शिक्षक पद भरती करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचे मोठ्या शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. ये कशासाठी करण्यात आले हे आता समोर येत आहे. शासनाकडून पदभरती झाली असती तर तासिका तत्त्वावर शिक्षक पदभरती करता आली नसती आणि माल लुटता आला नसता.

शाळेकडून शासनाची फसवणूक..
जीबीएमएम कॉलेज प्रशासनाने शासनाची फसवणूक केल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली. शासनाला अगोदर रिक्त पदांची माहिती दिली असती तर आज जीबीएमएम हायस्कूल ज्युनियर कॉलेज मध्ये कायमस्वरूपी शिक्षक पदभरती झाली असती आणि विद्यार्थ्यांच सुरू असलेले शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान थांबल असत.

मुख्याधिकारी व आमदार यावर चूप.
शहरातील काही शिक्षकांनी जीबीएमएम हायस्कूल ज्युनियर कॉलेज मध्ये सुरू असलेल्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी नगर पालिकेचे मुख्याधिकारी आणि हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील आमदार यांना निवेदनातून केली होती पण त्यांनी या गंभीर प्रश्नावर साधी दखल घेतली नाही. अशा गंभीर आरोप या शिक्षकांनी लावला आहे.

……. क्रमशः…….

हिंगणघाट नगर पालिकेच्या शाळेत शिक्षक भरतीत मोठा घोटाळा? वाचा पुढील अंकात….

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

21 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

23 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago