जि.प प्राथ. शाळा सुलतानपूर येथे राणी लक्ष्मीबाई बुलबुल युनिट पंचायत समिती हिंगणघाट द्वारे मेरी मिट्टी मेरा देश व क्रांती दिवस उत्साहात साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुलतानपूर येथे राणी लक्ष्मीबाई बुलबुल युनिट पंचायत समिती हिंगणघाट द्वारे मेरी मिट्टी मेरा देश व क्रांती दिवस उत्साहात साजरा .

आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान संपूर्ण देशभरात राबविले जात आहे, या अनुषंगाने राणी लक्ष्मीबाई बुलबुल युनिट पंचायत समिती हिंगणघाट येथील फ्लॉक लीडर संगीता पेठे यांच्याद्वारे 9 ऑगस्ट हा दिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुलतानपूर येथे क्रांती दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

देशाच्या स्वातंत्र्या करिता स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या क्रांतीमध्ये बरेच स्वातंत्र्यसैनिक शहीद झाले. या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ त्यांना आदरांजली अर्पण करून, त्यांनी घडवून आणलेल्या क्रांती विषयी माहिती तसेच वीरांच्या शौर्यगाथा मुख्याध्यापिका शुभांगी वासनिक यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. सहाय्यक अध्यापिका मयूरी देशमुख यांनी विद्यार्थ्यांना पंचप्राण शपथ देऊन, भारतात 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू. गुलामगिरीच्या मानसिकता मुळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध वर्षाचा गौरव करू. देशाची एकात्मता बलसारी करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्या प्रति सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करू. ही शपथ विद्यार्थ्यांना दिली. फ्लॉक लीडर संगीता पेठे यांनी विद्यार्थ्यांना तुम्ही सुद्धा देशाचे छोटे छोटे सैनिक आहात व देशांमध्ये स्वच्छता, प्लास्टिक निर्मूलन, वृक्षारोपण, यासारख्या कार्यक्रमांमध्ये नियमित सहभाग नोंदवून, पर्यावरणाचे रक्षण करून, देशामध्ये क्रांती घडवून आणू शकता, असे आव्हान केले.

विविध क्रांतिकारी नारे देत, जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये डॉ. मंगेश घोगरे, प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वर्धा, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा, जिल्हा मुख्य आयुक्त स्काऊट गाईड वर्धा, श्रीमती अलका सोनवाणे गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती हिंगणघाट. श्रीमती वैशाली अवथळे, जिल्हा संघटक वर्धा भारत स्काऊट गाईड वर्धा, यांचे मार्गदर्शन तर फ्लॉक लीडर संगीता पेठे, शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी वासनिक, सहाय्यक शिक्षिका मयुरी देशमुख यांचे सहकार्य लाभले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

21 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

23 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago