स्वारगेट पोलिस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी !एसटी स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना केले जेरबंद.

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुनिल झावरे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री सोमनाथ जाधव यांच्या आदेशाने स्वारगेट बस स्टैण्ड येथे होणा-या मोबाईल चोरी व इतर चोरीच्या होणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याकामी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना पेट्रोलिंग करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावरून तपास पथकातील पोलीस अंमलदार स्वारगेट पोलीस ठाणे हददीमध्ये पेट्रोलिंग करत असताना तपास पथकातील पो/अं संदीप घुले, पो/अं अनिस शेख, पो/अं सुजय पवार, पो/अ फिरोज शेख यांना त्यांचे गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन संशयित इसम स्वारगेट बस स्टॅण्ड येथे संशयितरित्या फिरत आहेत. अशी बातमी मिळाल्याने लागलीच सदरबाबत माहिती तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे व पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांना सांगितली असता त्यांनी सदर माहिती वरिष्ठांना दिली असता वरिष्ठांनी योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यास सांगितले होते. त्यावरुन सदर ठिकाणी जावुन बातमीप्रमाणे खात्री केली असता दोन संशयित इसम आम्हांस संशयितरित्या फिरत असताना दिसुन आल्याने आमची व त्यांची नजरानजर होताच सदर इसम पळुन जावु लागल्याने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव १) गणेश बालाजी भांडेकर वय २१ वर्षे धंदा मजुरी रा. खाडगाव रोड लातुर २) मैनुद्दीन इरफान पठान वय २४ वर्षे धंदा रिक्षाचालक रा. सदर यांच्याकडे अधिक चौकशी केली असता स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर गु.र.नं.६७/२०२३ भा.दं.वि. ३७९.३४ मधील विवो कंपनीचा मोबाईल चोरी केल्याचे कबुली दिल्याने सदर मोबाईल जप्त करणेकामी लातुर येथे जावुन तपास केला असता दाखल गुन्हयातील चोरीस गेलेला मोबाईल तसेच सदर आरोपींचे घरझडती दरम्यान १ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकुण २० मोबाईल फोन मिळुन आल्याने ते पुढील तपासकामी ताब्यात घेवुन जप्त करण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी ही मा. श्री. प्रविणकुमार पाटील सो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर, मा.श्री. नारायण शिरगावकर सो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल झावरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पो हवा मुकुंद तारु, शिवा गायकवाड, संदीप घुले, अनिस शेख, फिरोज शेख, रमेश चव्हाण, सोमनाथ कांबळे, दिपक रौंदाड, सुजय पवार, प्रविण गोडसे यांनी एकत्र मिळुन केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

21 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

23 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago