गुन्हे शाखा युनिट १ ची दमदार कामगिरी ! फसवणुकीच्या गुन्ह्यात सुमारे २ वर्षापासून फरार असलेला गुन्हेगारस केले जेरबंद .

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

युनिट १, गुन्हे शाखा, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. १४/०९/२०२० रोजी ते डिसेंबर २०२० रोजी पर्यंत तक्रारदार नामे प्रकाश सुरेश चव्हाण मुंबई यांना इसम नामे प्रफुल्ल कोळी यांनी स्वतःच्या मालकीची मासेमारी बोट नसताना ती स्वतःची आहे असे भासवुन मुळ मालकाच्या अपरोक्ष ती बनावट विक्री कराराच्या आधारे रुपये ३,८०,०००/- तक्रारदार यांचकडुन घेवुन फसवणुक केल्या बाबत यांचेविरुध्द कुलबा पोलीस ठाणे मुंबई गुन्हा नोंद क्रमांक- ३२६ / २०२१ भादवि कलम ४२०४६७, ४६८, ४७१, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यात आरोपी प्रफुल्ल कोळी हा गुन्हा दाखल झाले पासुन सुमारे ०२ वर्षापासुन फरार होता. दि.१५/०८/२०२३ रोजी ७६ व्या स्वातंत्रदिन निमित्त कोम्बींग दरम्यान युनिट-१ गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी असे युनिट-१ व्या हद्दीत हॉटेल, लॉजेस चेक करिता असताना समर्थ पोलीस ठाणे पुणे शहर हद्दीतील राजधानी हॉटेल येथे आले असता तेथील हॉटेलचे रजिस्टर चेक करत असताना प्रफुल्ल कोळी रा. ता. अलिबाग जि रायगड असे नाव रजिस्टरमध्ये नोंद होती. अधिकारी व अंमलदार यांना संशय आल्याने म्हणून पोलीस अंमलदार निलेश साबळे यांनी त्यांचे मोबाईलमध्ये असलेने कोर्ट चेकर अप्लीकेशनमध्ये सदर इसमाचे नाव टाकून चेक केले असता कुलबा पोलीस ठाणेकडील गुन्हा नोंद असलेबाबत दिसुन आले म्हणून सदर राजधानी हॉटेलचे मॅनेजर यांना घेवुन हॉटेल मधील रुममध्ये जावुन सदर इसमाचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव प्रफुल्ल जयवंत कोळी वय ३० वर्ष रा. मुं पो रेवस सारळ ता. अलिबाग जि. रायगड असे सांगितले असता त्यास दाखल गुन्हयाबाबत विचारणा करता उडवाउडवीचे उत्तरे देवु लागल्याने त्यास २०.३० वा सुमा, ताब्यात घेवुन युनिट १ गुन्हे शाखा पुणे येथील कार्यालयात घेवुन आलो. प्रथम कुलबा पोलीस ठाणेकडील पोलीस अभिलेख पाहणी करता गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयात पाहिजे आरोपीमध्ये नाव असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर इसमाकडे अधिक चौकशी करता त्याने सदर गुन्हयाबाबत कबुली दिली आहे. आरोपीस पुढील कारवाई कामी कुलबा पोलीस स्टेशन, मुंबई यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री रितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री संदिप कर्णिक सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री अमोल झेंडे पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे शहर, मा. श्री सुनिल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वपोनि शब्बीर सय्यद, पोउनि सुनिल कुलकर्णी, पोलीस अमलदार निलेश साबळे, अजय थोरात, दत्ता सोनावणे, राहुल मखरे, अभिनव लडकत, आण्णा माने व महेश बामगुडे यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

56 mins ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

23 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago