नाशिक: गणेशोत्सवात कोणत्याही अनुचित घटना घडू नये म्हणून पाच हजार पोलिसांसह होमगार्ड जवानांचा फौज फाटा तैनात.


✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतनिधी

नाशिकः- गणेशोत्सवात कोणत्याही अनुचित घटना घडू नये यासाठी शहर व ग्रामीण पोलीसानी बंदोबस्ताचे कडक नियोजन केले आहे सुमारे पाच हजार पोलिसांसह होमगार्ड जवानांचा फौज फाटा तैनात राहणार आहे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोध मोहीम करण्या सोबतच गून्हे होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गणेशोत्सवाची जय्यत तयारी सर्वत्र झाली आहे. गणरायाचे स्वागत वाजत-गाजत होणार असून, 10 दिवस धूमधडाक्यात, भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा होणार आहे. देखावे पाहण्यासाठीही भाविकांची गर्दी होणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर व पोलिस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यानुसार बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

असा असेल शहरात फौजफाटा
पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलिस उपआयुक्त, सात सहायक आयुक्त, 40 पोलिस निरीक्षक व 225 सहायक व उपनिरीक्षक पोलिस अधिकार्‍यांचा बंदोबस्त राहील. त्याचप्रमाणे तीन सत्रांत तीन हजार पोलिस अंमलदारांचा फौजफाटा तैनात राहील. अतिरिक्त कुमक म्हणून 150 कर्मचारी असतील, तर एक हजार 50 होमगार्ड जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे क्यूआरटी, आरसीपी, एसआरपीएफच्या प्रत्येकी 1-1 तुकड्या राहणार आहेत. शहरातील सुमारे 376 गणेश मंडळांना शहर पोलिस आयुक्तालयाकडून परवानगी देण्यात आली असून, यामध्ये 39 मौल्यवान गणपती असल्याचे विशेष शाखेच्या वतीने सांगण्यात आले.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्य विकी वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने आज महाआरोग्य शिबिरचे आयोजन.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…

16 hours ago

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

2 days ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

2 days ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

2 days ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

2 days ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

2 days ago