हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान, मुल्यांकन करून दिले जाणार पुरस्कार.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा,दि.17:- राज्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बसस्थानके स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपुरक करण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात बसस्थानकांची विविध बाबींच्या आधारावर मुल्यांकन करून त्यांना पुरस्कार दिले जाणार आहे.

या पुरस्कारासाठी बसस्थानकांची निवड करण्या करीता विभाग नियंत्रकाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमन्यात आली आहे. ही समिती दर दोन महिन्यांनी नेमुन दिलेल्या विभागाची तपासणी करून अहवाल मध्यवर्ती समितीकडे सादर करतो. वार्षिक मुल्याच्या सरासरी नुसार एकून गुणांच्या किमान 75 टक्के गुण असलेल्या बसस्थानकांचाच पुरस्कारासाठी विचार केला जातो. समसमान गुण असल्यास ज्या बसस्थानकावरील बसफेऱ्यांची संख्या जास्त आहे, असा स्थानकास वरचा क्रमांक दिला जाणार आहे. बक्षिसाची रक्कम बस स्थानकाच्या विकासासाठी व वर्षभर स्वच्छते बाबत उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षिस देण्यासाठी खर्च करता येणार आहे.

बसस्थानक तपासणीचे मुल्यांकन बसस्थानक व प्रसाधनगृहाची स्वच्छता, बसस्थानक व्यवस्थापक, हरित बसस्थानक, बसस्थानकावर येणाऱ्या बसेसची सखोल स्वच्छता, विविध महोत्सवाचे आयोजन, प्रवासी वाढवा अभियान या आधारावर होणार आहे. त्यासाठी वेगवेगळे गुण दिले जाणार आहे. जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, जाम, हिंगणघाट, कारंजा, पुलगाव, सेलू, आष्टी, तळेगाव, देवळी ही बसस्थानके अभियानात सहभागी झाली असल्याचे विभाग नियंत्रकांनी कळविले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

21 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

23 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago