दरोडा जबरी चोरी व घरफोडी चोरी करणारा १४१२ के. आर. टोळीच्या प्रमुखास त्याचे साथिदारासह दरोडा विरोधी पथकाने केले अटक ०१ दरोडा व ०५ घरफोडीचे गुन्हे उघड करून १८७ ग्रॅम सोने, ०१ गावठी पिस्त्ल तसेच ०२ जिवंत काडतूस व कार असा १२,११,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

दरोडा विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो. यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये दरोडा, जबरी चोरी व घरफोडी करणारे गुन्हेगारांची बातमी प्राप्त करुन त्यांचे विरुध्द कडक कार्यवाही करणेबाबत आदेश दिलेले होते. त्यानुसार आमचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील दरोडा विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, अधिकारी व अमलदार हे दरोडा, जबरी चोरी व घरफोडी चोरी करणाऱ्या इसमांची गोपनीय बातमी प्राप्त करीत होते. तेव्हा तेव्हा दिवंगत पोलीस नाईक १४९१ राजेश कौशल्ये यांना त्यांचे बातमीदारांकडून माहिती प्राप्त झाली की, ०५ घरफोडी व ०१ जबरी चोरीच्या गुन्हयामध्ये पाहिजे असलेला नोसरी दिघी परिसरातील १४५२ के. आर. टोळीचा म्होरक्या किरण गुरुनाथ राठोड याने मागिल आठ ते दहा महिन्यामध्ये अनेक चोऱ्या केल्या असुन तो त्याची ओळख लपवुन भोसरी दिधी परिसरातच वावरत असतो.

सदर मिळालेल्या बातमीच्या अनुशंगाने केलेल्या तांत्रिक विश्लेषनातुन दरोडा विरोधी पथकाकडील अधिकारी व अमलदार यांनी दि.५/०८/२०१३ रोजी आरोपी नामे किरण गुरुनाथ राठोड, वय २६ वर्षे रा रोडे हॉस्पीटल शेजारी, दिघी, पुणे यास त्याचे साथिदार अर्जुन कल्लप्पा सुर्यवंशी, वय- १९ वर्षे रा नवीन बाजार मैदान जवळ, कोरेगाव भिमा, पुणे व संतोश जयहिंद गुप्ता, वय १८ वर्षे रा खडोबा साळ, भोसरी, पुणे. यांचे सह एका लाल रंगाच्या फोर्ड फिगो या कार मधुन जात असताना ताब्यात घेतले. त्यांचकडे केलेल्या कसुन तपासावरुन त्यांनी दिघी पोलीस स्टेशन, पिं चि गुन्हा रजि. नं ५४२ / २०२२ भा.द.वि.क. ४५४.४५७.३८० हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने दरोडा विरोधी पथकाकडुन त्यांना सदर गुन्हयामध्ये अटक करून पुढील तपास सुरु केला.

सदर आरोपीकडे पोलीस कोठडीदरम्यान केलेल्या तपासात त्यांनी त्याचे एका वि.सं. बालक साथिदारासह घरफोडीचे ०५ गुन्हे केल्याचे तसेच आरोपी किरण राठोड व अर्जुन सुर्यवंशी यांनी त्यांचे अन्य साथिदारासह दरोडयाचा ०१ गुन्हा केल्याचे उघड झाले आहे. तपासादरम्यान आरोपींकडुन १८७ ग्रॅम सोन्याचे दागिने, किरण राठोड हा गुन्हा करतेवेळी जवळ बाळगत असलेले ०१ लोखडी पिस्टल व ०२ जिवंत काडतुस गुन्हा करतेवेळी वापरलेली फोर्ड फिगो कार असा एकुण १२,११,००० रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपीकडून चौरीचा मुद्देमाल विकत घेणारे कोरेगाव भिमा येथिल ०२ सोनार व्यवसायीक व परभणी येथिल ०१ सोनार व्यवसायीक यांना आरोपी करण्यात आलेले आहे. तसेच सोने विक्री करण्यास मदत करणाऱ्या एका व्यक्तिस देखील आरोपी करण्यात आलेले आहे. आरोपीकडुन खालील सहा गुन्हे उघडकीस आले आहे.

१) निगडी पोलीस स्टेशन, पिं चि गुन्हा रजिस्टर नंबर २३/२०२३ भा.द.वि.क. ४५७,३८० प्रमाणे –
२) सांगवी पोलीस स्टेशन, पि चि गुन्हा रजिस्टर नंबर ३६२ / २०२३ भा.द.वि.क. ४५७,३८० ३४ प्रमाणे
३) भोसरी पोलीस स्टेशन, मिं चि गुन्हा रजिस्टर नंबर ६४१ / २०२३ भा.द.वि.क. ४५७४५४,३८० प्रमाणे ४) दिघी पोलीस स्टेशन, पिं चि गुन्हा रजिस्टर नं ५४२/२०२२ भा.द.वि.क ४५४, ४५७,३८० प्रमाणे ५) आळंदी पोलीस स्टेशन, पिं चि गुन्हा रजिस्टर नंबर – २०३ / २०२३ भा.द.वि.क. ४५७,३८० प्रमाणे
(६) चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिन १८६६ / २०२२. भा.द.वि.क. ३९५.३६५.३४१, ३२३,५०६ भा.ह.का.क. ४ (२५) सदर आरोपी किरण राठोड याचेविरुद्ध दरोडयाचा प्रयत्न जबरी चोरी, घरफोडी व गर्दी मारमारी अश्याप्रकारचे पिं.चि. आयुक्तालयाच्या अभिलेखावर एकुण ३५ गुन्हे दाखल असुन तो खालील गुन्हयामध्ये पाहिजे आरोपी आहे.

१. निगडी पोलीस स्टेशन, पिं चि गुन्हा रजि नं १७७/२०२० भा.द.वि.क. ४५४, ४५७,३८० प्रमाणे
२. निगडी पोलीस स्टेशन, पिंच गुन्हा रजि नं ३१३/२०२० मा.द.वि.क. ४५४, ४५७,३८० प्रमाणे
३. निगडी पोलीस स्टेशन, पिं चि गुन्हा रजि नं ४४३ / २०२० भा.द.वि.क. ४५४.४५७,३८० प्रमाणे
४. निगडी पोलीस स्टेशन, पिंच गुन्हा रजि नं ४८३/२०२० भा.द.वि.क. ४५४.४५७.३८० प्रमाणे
५. निगडी पोलीस स्टेशन, पिं चि गुन्हा रजि नं ४८२ / २०२० भा.द.वि.क. ३७९ प्रमाणे
६. सागवी पोलीस स्टेशन, पिं चि येथे गुन्हा रजि नं २६२/२०२२ भा.द.वि.क. ३९२.३४ प्रमाणे

नमुद आरोपींना उघड गुन्हयाचे पुढील तपासकामी संबधित पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात येत असुन दिघी पोलीस स्टेशन, पिंच गुन्हा रजि न ५४२ / २०२२ या गुन्हयाचा पुढील तपास दरोडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख हे करीत आहेत.

सदर कामगिरी मागे बातमी असलेले दिवंगत पोलीस नाईक १४९१ राजेश कौशल्ये यांचा आरोपी अटक केलेचे दुसऱ्या दिवशी दुर्देवाने गंभिर अपघात होवुन त्यांची उपचारादरम्यान दि. १४/०८/२०२३ रोजी रुबी हॉस्पीटल, पुणे येथे प्राणज्योत मावळली.त्यांचे नातेवाईकांनी मृत्युपश्यात त्यांचे अवयव दान करून समाजासाठी एक मोठा आदर्श निर्माण केला आहे.

सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा. श्री. विनयकुमार चौबे सो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सो सह पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा श्री बसत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा, स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड, मा श्री सतिश माने सो. सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, पिपिं. मा श्री बाळासाहेब कोपनर सो. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १ पि वि. याच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक, दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार राजेश कौशल्ये, सुमित देवकर, गणेश सावंत, विनोद वीर, आशिष बनकर, गणेश हिंगे, गणेश कोकणे, उमेश पुलगम, समिर रासकर, अमर कदम, महेश खांडे, नितीन लोखंडे, सागर शेडगे, राहुल खारगे, चिंतामण सुपे व आंदुबर रोंगे सर्व नेमणुक दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा व टी.ए.डब्ल्यु विभागाचे नागेश माळी व पोपट हुलगे यांनी केली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

53 mins ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

23 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago