भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका स्तरीय चिंतन प्रशिक्षण शिबीर संपन्न, शेकडो नागरिकांची उपस्थिती.

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो. 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा (पश्चिम विभाग) अंतर्गत तालुका शाखा राजुराच्या वतीने “सम्यक बुध्द विहार सोमनाथपूर वॉर्ड राजुरा येथे तालुका स्तरीय चिंतन प्रशिक्षण शिबीरचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा तालुका राजुरा शाखा, शहर, ग्राम शाखा व वैशाली महिला मंडळ राजुरा तर्फे चलो बुध्द की ओर, बुध्द विहार जोडो या योजने अंतर्गत शिबीराचा कार्यक्रम संपन्न झाला.

या शिबिरामध्ये सर्व प्रथम तथागत गौतम बुध्द आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संदीप सोनोने, कैवीसताई मेश्राम, रत्नमालाताई मावलिकर, किरणताई खैरे, भिमराव खोब्रागडे, मुरलीधर ताकसांडे, धर्मु नगराळे याच्या हस्ते दीप प्रजलित करून त्रिशरण पंचशील घेऊन पाहुण्याचे स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घघाटन संदीप सोनोने सर यानी केले तर प्रमुख मार्गदर्शिका कैविसताई मेश्राम केंद्रीय शिक्षिका चंद्रपूर यांनी चिंतन शिबीर मध्ये बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार आपण स्वतः करायचे कसे व भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने डॉ.. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धम्म क्रांती मध्ये माझा काय वाटा आहे याबाबत प्रत्येकांनी आत्मचिंतन ही धम्म क्रांती पुढे नेण्यासाठी मी काय केलं पाहिजे या बाबत चिंतन करून कार्य करण्याचे आवाहन केले. अतिशय साध्या, सोप्या सहज समजणार आपल्या भाषेत ऊत्तम प्रकारे समजाऊन दिले.

या कार्यक्रमाला असंख्य तालुका शाखा, शहर, ग्राम शाखाचे पदाधिकारी तसेच उपासक, उपासिका यांनी सहभाग घेऊन धम्माचे प्रशिक्षण घेतले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मुजी नगराळे भा. बौ. म राजुरा तालुका अध्यक्ष होते. तर सर्वांनी शिबीरास मार्गदर्शन केले. या अगोदर रमाई प्रबोधन 2022 मध्ये रमाई प्रबोधन, धम्म उपासिका शिबिर बामण वाडा, राजुरा, केंद्रीय शिक्षिकाच्या सत्कार व प्रबोधन, वर्षावास प्रवचन मालिका आणि 2023 मध्ये गोवरी येते धम्म उपासिका शिबिर, तक्षशिला नगर बामणवाडा,बाल धम्म सस्कार शिबीर,कार्यकर्ता शिबिर, वर्षा वास मालिका,चिंतन शिबिर इत्यादी 24 शिबिर पैकी वरील शिबिरे राबविण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिमराव खोब्रागडे तर सुंदर संचालन वंदनाताई देवगडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन लताताई नगराळे यांनी केले. शेवटी सरणत्य घेऊन कार्यक्रम संपन्न झाला. शेवटी सर्वा करीता चाय व बिस्कीट ची व्यवस्था करण्यात आलेली होती. सम्यक बुध्द विहार सोमनाथपूर वॉर्ड राजुरा येथील सदर कार्यक्रम अविस्मरणीय झाला. कार्यक्रमाचे तालुका शाखेचे अध्यक्ष धर्मुजी नगराळे सर्वच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या महिलांचे व पुरुषांचे चंद्रपूर जिल्हा, तालुका व शहर शाखेतर्फे हार्दिक अभिनंदन, धन्यवाद आणि सहर्ष आभार मानण्यात आले. तसेच भारतीय बौद्ध महासभाच्या कार्यास सहकार्य करावे आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब यांनी दिलेला विज्ञानवादी बौद्ध धम्म घरा घरात पोहचवावा हीच मंगलकामना करण्यात आली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

12 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

15 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

2 days ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

2 days ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

3 days ago