आर्वी येथील तपस्या पब्लिक स्कूल मधील शिक्षकाने विद्यार्थाला मारहाण केल्याने विद्यार्थ्याचा एक कान कायमचा निकामी.

अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील तपस्या पब्लिक स्कूल आर्वी येथील एका शिक्षकाने विद्यार्थाला मोठ्या प्रमाणात मारहाण केल्याने या विद्यार्थ्याचा एक कान कायमचा निकामी झाला आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

तपस्या पब्लिक स्कूल येथे शिकविणाऱ्या किशोर राऊत नावाच्या शिक्षकाने विद्यार्थ्यांला मारहाण केली व त्या मारहाणीमुळे त्या मुलाचा एक कान कायमचा निकामी झाला आहे. हे धक्कादायक बाब आर्वी शहरातील “तपस्या पब्लिक स्कूल’ या शाळेत घडली. या मारहाणीत या मुलाला कायमचा एक कान गमवावा लागला आहे.

शिक्षकाने विद्यार्थाला मारहाण केली त्यात त्याचा एक कान निकामी झालाची घटना समोर येताच आई वडील व नागरिकांनी शिक्षकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी यांच्या जवळ प्रतिक्रीया देताना व्यक्त केली. आता या प्रकरणी शाळा प्रशासन या शिक्षकावर काय कारवाई करणार हे बघावं लागणार आहे.

काय सांगतो विद्यार्थांसाठी कायदा… भारतात बालकांसाठी आणल्या गेलेल्या निःशुल्क आणि अनिवार्य बाल शिक्षण अधिनियम, 2009 (RTE) यामध्ये त्यांना शारीरिक आणि मानसिक छळपासून संरक्षण देण्यात आलेलं आहे. तसंच, द जुवेनाईल जस्टीस (केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन) अक्ट, 2000 नुसारही बालकांसाठी अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. RTE च्या सेक्शन 31 अंतर्गत बालकांना शिक्षणाचा अधिकार मिळतो. त्याच्यावर निरीक्षण ठेवण्यासाठी नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्सने (NCPCR) स्थापन करण्यात आलेलं आहे. NCPCR ने शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षा किंवा कॉर्पोरल पनिशमेंट संपवण्यासाठी दिशानिर्देश दिले आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

8 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

11 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago