विश्वास त्रिभुवन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अस्तगाव:- रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल अस्तगाव विद्यालयामध्ये लायन्स क्लब ऑफ इंडिया शाखा राहाता यांच्या वतीने विद्यालयातील गरीब व होतकरू सुमारे 40 विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये किमतीच्या वह्यांचे मोफत वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लबच्या अध्यक्षा अंजली संजय उबाळे होत्या. याप्रसंगी त्यांनी लायन्स क्लब तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. आर्थिकदृष्ट्या गरीब असणारे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांना शालेय साहित्य चप्पल, शूज, वह्या, ब्लॅंकेट, पाणी बॉटल, दप्तर असे विविध प्रकारचे साहित्य वाटपाचे उपक्रम या क्लबच्या वतीने दरवर्षी राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात देखील आपल्या विद्यालयाच्या काही अडचणी असल्यास त्यादेखील सोडवल्या जातील असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच डॉ. संजय उबाळे यांनी देखील आपल्या मनोगतामध्ये अस्तगाव विद्यालयाला पाण्याचे नवीन फिल्टर देण्याचे जाहीर केले. तसेच लांब अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सायकलची, पिण्याच्या पाण्याच्या टाकीची सुविधा समजावून सांगितली. रवींद्र धस यांनी देखील इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांपेक्षा मराठी माध्यमातून जास्तीत जास्त सर्व सामान्य मुले शिक्षण घेतात, त्यांना विविध अडचणी असतात असे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक प्रमोद तोरणे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा शाल व गुच्छ देऊन विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विजय धनवटे, श्वेता कार्ले, अँड. दिनेश कार्ले, व्यंकटेश अहिरे, डॉ. मनाली उबाळे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सखाराम शिंदे, ज्ञानेश्वर राजळे, ज्ञानेश्वर केदार, प्रतीक्षा थोरात, निर्मला लावरे, छाया जेजुरकर, सुमन कणसे, वामन घोडसरे, किरण आंबेकर, प्रदीप तडवी, रोहिदास पोटकुले, सचिन चौधरी, वृषाली बेल्हेकर आदींनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कदम यांनी केले. तर रोहिणी देव्हारे यांनी आभार मानले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…