पुण्यात भारी ! गून्हे शाखेची कामगिरी…खुनासारख्या गंभीर गुन्हयातील आरोपींना ४८ तासामध्ये जेरबंद,

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

गून्हे शाखा पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक १५/०८/२०२३ रोजी रात्री ०१.१० या सुमा मंगला टॉकीज समोर सार्वजनिक रोडवर इसम नामे नितीन मोहन म्हस्के वय ३५ वर्ष रा. १३ ताडीवाला रोड, पुणे हे त्याचे मित्रासोबत गदर २ सिनेमा पाहून दुचाकीवर पाठी मागे बसुन घरी जात असताना त्यांचे वस्तीमध्ये रहाणारे इसम नामे १. सागर कोळानही उर्फ यल्ल्या २. मलिक ऊर्फ मल्या कोळी, ३. इम्रान शेख, ४. पंडीत कांबळे, ५. विवेक उर्फ भोला, ६. लॉरेन्स पिल्ले. ७. सुशील सुर्यवंशी, ८. मनोज हावळे, ९. आकाश उर्फ घडी १० रोहन उर्फ गच्छी इतर ७ ते ८ साथीदारांनी घातक हत्यारानीशी मोटार सायकलीवरून येवून नितीन म्हस्के व त्याचा मित्र सतिश आनंदा वानखेडे यांना खाली पाडून नितीन म्हस्के याचेवर हल्ला करून जीवे ठार मारले होते. सदरयायत नितीन म्हस्के याचा मित्र सतिश आनंदा वानखेडे याने दिलेल्या तक्रारी वरून शिवाजीनगर पो स्टे गुर नं १७१ / २०२३ भादवि कलम ३०२, १४१, १४२, १४३, १४४, १४५, १४७, १४८.१४९ आर्म अॅक्ट ४/२५, महा पो अॅक्ट ३७ (१) (३) सह १३५ अन्यये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हा घडताच आरोपी पुण्यातून फरार झाले होते. त्यांना तात्काळ ताब्यात घेणेबाबत मा. वरिष्ठ अधिकारी यांनी मार्गदर्शन व सुचना देवून युनिट १ युनिट २, खंडणी विरोधी पथक

१ दरोडा व वाहन चोरी पथक १ असे गुन्हे शाखेकडील ०६ पथके तयार केली होती. त्याप्रमाणे आरोपींचे ठाव ठिकाणाबाबत तांत्रीक विश्लेषण च बातमीदारामार्फत माहिती घेत असताना गुन्ह्यातील मुख्य आरोपी सागर उर्फ यल्ल्या हा व त्याचे साथीदार हे लातुर, सोलापुर, कोल्हापुर, पुणे ग्रामीण, पुणे शहर परिसरात तसेच परराज्यात कर्नाटक येथील रायपूर, बेळगाव मध्ये असलेबाबत माहिती मिळाल्याने आरोपींच्या शोध घेणेकामी वरील पथके रवाना केले होते.

युनिट १ गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांचे नेतृत्वाखाली कर्नाटक येथे गेलेले पथकाने आरोपी नामे १) सागर ऊर्फ यल्ल्या ईराप्पा कोळानट्टी वय ३५ वर्ष रा. महात्मा फुले वसाहत, १३ ताडीवाला रोड पुणे सध्या लेन ५ गंगानगर वरद विनायक सोसायटी हडपसर पुणे २) सुशिल अच्युतराव सुर्यवंशी वय २७ वर्ष रा. चमन बेकरी पाठीमागे, १३ ताडीवाला रोड पुणे
३) शशांक ऊर्फ वृषभ संतोष बेंगळे वय २१ वर्ष रा. जगदीश सायकल मार्ट पाठीमागे १३ ताडीवाला रोड पुणे ४) गुडगप्पा फकीरप्पा भागराई वय २८ वर्ष रा. मिलींद बुद्ध विहारजवळ, १३ ताडीवाला रोड पुणे
५) एक विभिसंर्घषीत बालक यांना रायचुर हुदली, ता बेळगाव, राज्य कर्नाटक येथील दुर्गम भागातून शोध घेवून ताब्यात घेतले तसेच पुण्यातील नेमण्यात आलेल्या पथकाने खालील नमुद आरोपी यांना विश्रांतवाडी, पुणे शहर व चौफुला पुणे ग्रामीण यामागातून खालील आरोपी यांना ताब्यात घेतले,६) मलेश ऊर्फ मल्ल्या शिवराज कोळी वय २४ रा. आगरवाल क्लिनीक बाजुला, भाजी मार्केट, १३ ताडीवाला रोड पुणे ७) किशोर संभाजी पात्रे वय २० वर्ष रा. गल्ली नं ११ भाजी मंडई, रमाबाई आंबेडकर रोड पुणे ८) साहिल उर्फ सल्ल्या मनोहर कांबळे वय २० वर्ष रा. १३ ताडीवाला रोड महात्मा फुले वसाहत पुणे.९) गणेश शिवाजी चौधरी वय २४ वर्ष रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, जि.पुणे.१०) रोहित बालाजी बंडगर वय २० वर्ष रा नवरत्न तरूण मंडळाजवळ, ताडीवालारोड, पुणे. युनिट १ कडून एकुण १० आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत.

खंडणी विरोधी पथक -१ कडील पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांचे नेतृत्वाखाली पथकाने केशवनगर. मुंढवा, पुणे भागात शोध घेवून खालील आरोपींना ताब्यात घेतले.११) विवेक ऊर्फ भोला भोलेनाथ नवघरे वय २५ वर्ष रा. फ्लॅट नं ३१४ मुळीक कॉम्पलेक्स रामवाडी पुणे१२) इम्रान हमीद शेख वय ३१ वर्ष रा. झेड कॉर्नर ४० फुटी रोड केशवनगर पुणे.खंडणी विरोधी पथक -१ कडून एकुण ०३ आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत.दरोडा व वाहन चोरी पथक १ कडील पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांचे नेतृत्वाखाली पथकाने खडकवासला. पुणे ग्रामीण भागातुन खालील नमुद आरोपीस ताब्यात घेतले. १३) आकाश ऊर्फ चड्डी सुनिल गायकवाड वय २२ वर्ष रा. धावडे पेट्रोल पंप उत्तमनगर पुणे. दरोडा व वाहन चोरी पथक १ कडून ०१ आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत…

युनिट २ गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांचे नेतृत्वाखाली पथकाने खराडी. कल्याणीनगर पुणे भागात शोध घेवून थालील नमुद आरोपीतांना ताब्यात घेतले. १४) लॉरेन्स राजु पिल्ले यय ३६ वर्ष रा. १३ ताडीवाला रोड पुणे. १५) मनोज उर्फ बाबा विकास हावळे वय २३ वर्ष रा. जोगमाया मिनीमार्केट शेजारी,१३ ताडीयालारोड. पुणे. १६) रोहन उर्फ मच्छी मल्लेश तुपधर वय २३ वर्ष । नवरत्न तरूण मंडळाजवळ, १३ ताडीवालारोड, पुणे. १७) विकी उर्फ नेप्या काशीनाथ कांबळे वय २२ वर्ष रा नवरत्न तरुण मंडळाजवळ, १३ ताडीवालारोड, पुणे.

युनिट – २ गुन्हे शाखेकडून ०४ आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत. करील एकुण ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीताकडुन गुन्ह्यात वापरलेल्या ४ मोटार सायकली १ यामाहा एफ झेड क्र एमएच १२ एलडब्ल्यु ८०७९.
२. यामाहा मोटार सायकल क्र. एमएच १२ युएल ६६४४ ३. होंडा डिओ क्रमांक एमएच १२ टीजी ५५४१ ..४. प्राझीया मोपेड क्रमांक एमएच १२ आरएक्स-५९९८
…असे एकुण किं रू २,००,०००/- च्या ०४ मोटार सायकली व साथीदारांना संपर्क साधन्यासाठी वापरलेले कि रु ५०,५००/- चे एकुण ०५ मोबाईल हॅण्डसेट असा एकुण २,५०,५००/- किं रु चा मुद्देमाल जप्त गुन्ह्यातील मुख्य ०९ आरोपी व ०८ संशयीत आरोपी यांना गुन्हे शाखेने ताब्यात घेवुन पुढील करण्यात आला आहे.कार्यवाहीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाणे, पुणे यांचे ताब्यात दिले आहेत. ताब्यातील खालील आरोपींविरूध्द पुणे शहरातील बंडगार्डन व कोरेगाव पोलीस ठाण्यास गुन्हे दाखल आहेत.१) सागर ऊर्फ यल्ल्या ईराप्पा कोळानट्टी यांचेवर खुनाचा प्रयत्न, एमपीडए. अग्नीशस्त्र जवळ बाळगणे असु एकुण १६ गुन्हे दरोडा, दरोडयाची तयारी, गंभीर दुखापत, २) सुशिल अच्युतराव सुर्यवंशी याचेवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत, गर्दी मारामारी असे ०५ गुन्हे ३) शशांक ऊर्फ वृषभ संतोष बेंगळे याचेवर खुनाचा प्रयत्न असा ०१ गुन्हा ४) किशोर संभाजी पात्रे याचेवर गंभीर दुखापत, जबरी चोरी असे ०२ गुन्हे ५) साहिल उर्फ सल्ल्या मनोहर कांबळे याचेवर गंभीर दुखापतीचे ०२ गुन्हे..६) गणेश शिवाजी चौधरी गंभीर दुखापत, बलात्कार असे ०३ गुन्हे ७) रोहित बालाजी बंडगर वाहनचोरीचा ०१ गुन्हा..८) मनोज उर्फ बाबा विकास हावळे खुनाचा प्रयत्न गर्दा मारामारी असे ०३ गुन्हे ..९) रोहन उर्फ मच्छी मल्लेश तुपधर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत असे ०५ गुन्हे
१०) विकी उर्फ नेप्या काशीनाथ कांबळे याचेवर दुखपत करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे ०२ गुन्हे

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. श्री रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री संदिप कर्णिक सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री अमोल झेंडे पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा. श्री सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे – १. पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद युनिट २ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, खंडणी विरोधी पथक १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, दरोडा व वाहनचोरी पथक १ कडील

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

21 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

23 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago