नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाटच्या वतीने टी. बी रुग्णांना निःशुल्क पोषण आहार किटचे वितरण.

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- केंद्र शासनाच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम टी. बी क्षयरोग मुक्त अभियान अंतर्गत नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाटच्या वतीने 40 टी. बी रुग्णांना निःशुल्क पौष्टिक आहार किटचे वितरण करण्यात आले. स्थानिक पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवी विश्रांती कुंटेवार संचालक कामत हॉटेल होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ हेमंत पाटील, अशोक मिहानी संचालक अशोका इंडस्ट्रीज, नरेश खडगी माजी सैनिक, समाजसेवी राजेश बतरा, जितेंद्र बाखडे जिल्हा समन्वयक, डॉ. विशाल रुईकर तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा समन्वयक डॉ. सुमन ढोबळे, महेश अग्रवाल, अध्यक्ष नारायण सेवा मित्र परिवार टी.बी विभागाचे पर्यावेक्षक मनोज वरभे, नांदुरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते शहरातील 40 टी. बी क्षयरोगाने बाधित असलेल्या रुग्णांना किटचे वाटप करण्यात आले. यामधे गूळ, पेंडखजुर, चना, शेंगदाणा, मुंग, मोट, बिस्कीट आदीचा समावेश आहे. १२ महिन्यापर्यंत सर्व रुग्णांना दर महिन्याला नियमित पणे किट देण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाटच्या वतीने यावेळी देण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविकासह संचालन सचिव पराग मुडे यांनी केले. उपस्थितांचे आभार सिद्धार्थ बहादे यांनी मानले. या कार्यक्रमाला विपिन खिंवासरा, मनोज सिंघवी, ॲड. विशाल जैन, प्रा. किरण वैद्य, दुर्गाप्रसाद यादव, रूपचंदजी हेमनानी, प्रकाश जोशी, रामदास खड़गी, विजय परते, अरुण पंडित, महेश खडसे, लक्ष्मण डहाके, सुभाष शेंडे, अमोल भूतड़ा, चंद्रकांत रोहनकर, शुभम कोचर, नंदीनी जवादे, किरण अग्रवाल, कंचन खिवसरा, अनुराधा मोटवानी, जिया पाखरानी, वीरा पाखरानी आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

19 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

21 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago