उमेश इंगळे यांच्या मागणीला यश सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये एम.आर.आय मशिन सुरू

अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होऊन बरेच दिवस झाले.पंरतु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पुर्ण क्षमतेने अजुनही सुरू झाले नाही. रुग्णांवर योग्य व तत्परतेने उपचार व्हावेत. म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात आले. परंतु या हॉस्पिटल मध्ये रुग्णांला पाहिजे तश्या सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना एम.आर.आर करण्यासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये खुप मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. म्हणून सामाजिक कार्यकर्ता तथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, अकोला जिल्हाधिकारी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये यांना निवेदन देऊन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये एम.आर.आय मशीन सुरू करण्यात आली यावी याकरिता वारंवार निवेदन देऊन सातत्याने पाठपुरावा केला होता.

सदर निवेदनाची दखल घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी शासनाकडे पाठपुरावा करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये रुग्णांच्या सेवेसाठी एम.आर.आय मशीन सुरू करण्यात आली आहे.सामाजीक कार्यकर्ता तथा रुग्णसेवक संघटनेचे महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीला यश आले असून महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये यांचा सत्कार करण्यात आला. रुग्णांना आता आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही. यावेळी सामाजिक कार्यकर्ता सागर सिरसाठ, समिर खान, विशाल भोसले, ॲड रोशन तायडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

21 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

23 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago