शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन पथकाची कामगिरी ! मेफेनटर माईन सल्फेट (उत्तेजक इंजेशन) व गांज्या विक्री करणाऱ्या आरोपींना अटक ..

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीमधील मौजे शिरगाव ता मावळ जि पुणे येथे अभिमान सोसायटी समोर रोडचे बाजुला दोन इसम अंमली पदार्थ व औषधांची बेकायदेशीर रित्या विक्री करणे कामी येणार आहे अशी गुप्त बातमी दार व्दारे बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचुन अतिशय शिताफिने MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP औषधे, गांज्या सुरा व आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन गु. रं.नं. २४१ / २०२३ भादवि कलम २७६.३३६,३२८ व एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) सह भारतीय हत्यार कायदा कलम ४.२५ प्रमाणे दिनांक १७/०८/२०२३ रोजी सदर इसमा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक १६/०८/२०२३ रोजी २१/३० वा. चे सुमारास “शिरगाव गावाचे हद्दीत अभिमान सोसायटी समोर रोडचे बाजुला ता मावळ जि पुणे येथे दोन इसम अंमली पदार्थ व औषधांची बेकायदेशीर विक्री करणे कामी येणार आहेत. अशी गुप्त बातमी दारा व्दारे माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचुन अतिशय शिताफिने त्यांना ताब्यात घेतलेले असुन त्याचे नावे १) सुमित गणेश पिल्ले, वय ३२ वर्षे, सध्या रा. कृष्णा कॉलणी, साई निवास, काका पेट्रोलपंपा जवळ, साने चौक, चिखली, पुणे, मुळ रा. फ्लॅट नं २०३, सोनिग्रारपल, दांगटवस्तीचे पाठीमागे, विकासनगर, देहुरोड, ता हवेली जि पुणे २) चैतन्य उमेश कुन्हाडे, वय २१ वर्षे रा फ्लॅट नं एस ५ नवरत्न सोसायटी, डिमार्ट जवळ, विकासनगर, किवळे, देहुरोड, ता. हवेली, जि.पुणे याचे ताच्यामध्ये १३७५/- रुपये किंमतीचा ५५ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ च MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP इंजेक्शनच्या १४५ पॅकबंद बाटल्या औषध विक्री परवाना नसताना, त्याचे कोणतेही शिक्षण घेतले नसताना, सदर औषध केमिकल असुन, डॉक्टराचे सल्ल्याशिवाय वापरल्यास व व्यक्तीस टोचल्यास त्यातील विषारीद्रव्याचे दुष्परिणाम होवुन, औषध घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यु किंवा आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते हे माहित असतांना सुध्दा बॉडी बिल्डिंग व नशेसाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने अनाधिकाराने बेकायदेशीररीत्या विक्री करीता आपले कब्जात ४५६७५/- रु. किंमतीच्या MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP इंजेक्शनच्या १४५ पॅकबंद बाटल्या व रोख रक्कम ४०००/- रुपये तसेच दोन दोनचाकी वाहने व लोखडी सुरा असा एकुण १,२१,३५० /- रु किं चा मुद्देमाल मिळुन आलेला आहे. सदरचा मुद्देमाल गुन्हयाचे तपास कामी जप्त करण्यात आलेला असुन सदर आरोपी विरुध्द शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे गुर नं २४१ / २०२३ भादवि कलम २७६,३३६,३२८ व एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ ( क ) २०( 1 ) ( 11 )(ब) सह भारतीय हत्यार कायदा कलम ४२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्या आलेला असुन सदर गुन्हयामध्ये आरोपीना अटक केली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ हे करत असुन सध्या आरोपी पोलीस कस्टडी मध्ये आहेत.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे सो सह. पोलीस आयुक्त श्री डॉ संजय शिंदे सो, अपर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी सो, पोलीस उप आयुक्त श्री डॉ. काकासाहेब डोळे सो, सहा. पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग, श्री पद्माकर घनवट सो, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरगाव परंदवडी पो.स्टे. बनिता एस धुमाळ, पोहवा / ४७१ टी. सी. साबळे, पोना / १२३१ एस. बी. घाडगे, पोना / १२५० वाय. जे. नागरगोजे, पोअंम / २२४१ एस. एल. फडतरे व पोअंम / २५७६ डी व्ही राठोड यांनी केलेली आहे.

पंकेश जाधव

Share
Published by
पंकेश जाधव

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

21 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

23 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago