स्व.राहुल सोरटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी व आरोग्य कार्ड वाटप शिबीर.

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्व.राहुल सोरटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य आरोग्य तपासणी शिबीर व आरोग्य कार्ड वाटप शिबीराचे आयोजन स्थानिक संतोषी माता मंदिर नागपूर रोड येथे आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केले.

या भव्य आरोग्य तपासणी शिबीर व आरोग्य कार्ड वाटप शिबीरात प्रमुख उपस्थिती माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, विधानसभा महिला अध्यक्षा निताताई गजबे, शहर सचिव अर्चनाताई नांदूरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आरोग्य शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस तथा युवक काँग्रेस चे प्रशांत लोणकर, राहुल जाधव, यांनी केले.

या शिबिरामध्ये नेत्र रोग तपासणी, श्रय रोग तपासणी, कृष्ठ रोग तपासणी, किडणीची तपासणी, बिपी, शुगर तपासणी, ICDC तपासणी, CBC/HB तपासणी तसेच त्या त्या विभागाचे तज्ञ डॉक्टर कॅन्सर तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, हृदय रोग तज्ञ, एम.डी. मेडीसीन, बिपी, शुगर, इजिसी, दंत रोग तज्ञ, औषधी विभाग, नेत्र रोग तज्ञ यांची तपासणीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिवनदायी आरोग्य विकास फाउंडेशन तर्फे नाममात्र रुपयांमध्ये मध्ये आरोग्य कार्ड वाटप करण्यात आले. जेणेकरून दैनंदिन जिवनातील आरोग्य योजनांची एकत्रित माहिती रुपये पाच हजार ते दोन लाखा पर्यंत बचत होईल. आरोग्य शी निगडित सेवा व आरोग्य चाचण्या व इतर उपचार यावर ५०% पर्यंतची सूट देण्यात येते. हे आरोग्य कार्ड एका परिवारातील सहा सदस्यांसाठी मात्र १२० रुपये शुल्क असून पाच वर्षा साठी मान्य राहील आरोग्य सेवा वर १० ते ५० % पर्यंतची सूट औषधींवर राहणार असून ही योजना गरीब, वंचित ग्रामीण परिवारासाठी आहे. या आरोग्य कार्डचे वाटप आरोग्य शिबिरामध्ये करण्यात आले. या शिबिरामध्ये शुअरटेक हॉस्पिटल जामठा, एच.सी.जी कॅन्सर हॉस्पिटल नागपूर, जीवनदायिनी आरोग्य विकास फाउंडेशन यांनी सेवा दिली. या आरोग्य शिबिराचा ५३८ नागरिकांनी लाभ घेतला. तर १२० नागरिकांनी आरोग्य कार्ड काढले.

आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रशांत लोणकर, राहुल जाधव, अमोल त्रिपाठी, पंकज वांदिले, मारोती बावणे, सुनील ठाकरे, सतीश शेंडे, रविकिरण कुटे, आकाश बोरीकर, अंकुश दरोळी, आकाश चंदणखेडे, अनुप पाथरे, प्रणय सुपारे, प्रतीक चाफले, योगेश सुपारे, प्रद्युन इटनकर, प्रभाकर सुपारे, चिंटू खानंदे, अंकित सुपारे, कुणाल ढोणे, जगदीश लोणकर, मिथुन चव्हाण, प्रवीण दरवेकर, प्रमोद महाकाळकर, कृष्णा कामडी, रोशन देवतळे, नकुल चावरे, प्रभाकर देवतळे, अनिल हिंगणकर यांनी परिश्रम घेतले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

19 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

21 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago